आबोजवार, वाढई, यादव सभापती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2017 01:12 IST2017-05-19T01:12:22+5:302017-05-19T01:12:22+5:30

मनपा व महापौर पदाची निवडणूक झाल्यानंतर आता विविध विभागातील पदाधिकाऱ्यांची निवडणूक होत आहे.

Appearance, increase, Yadav Chairman | आबोजवार, वाढई, यादव सभापती

आबोजवार, वाढई, यादव सभापती

झोन सभापती निवडणूक : भाजपाचे दोन तर बसपाचा एक
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : मनपा व महापौर पदाची निवडणूक झाल्यानंतर आता विविध विभागातील पदाधिकाऱ्यांची निवडणूक होत आहे. गुरुवारी झोन सभापतींची निवडणूक पार पडली. यात भाजपाच्या आशा आबोजवार व देवानंद वाढई आणि बसपाच्या रंजना यादव हे विजयी झाले आहेत.
मनपाचा कारभार गतिमान व सुरळीत चालावा, नागरिकांनाही वारंवार मनपा कार्यालयाच्या चकरा माराव्या लागू नये म्हणून मनपाकडून शहरात तीन झोन कार्यालयाची निर्मिती केली आहे. येथील झोन सभापतींची निवडणूक प्रक्रिया मनपाच्या सभागृहात गुरुवारी सकाळी ११ वाजता सुरू झाली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून जिल्हाधिकारी आशुतोष सलिल उपस्थित होते.
प्रारंभी झोन क्रमांक १ साठी निवडणूक घेण्यात आली. या झोन सभापती पदासाठी भाजपाच्या वनिता डुकरे व बसपाच्या रंजना यादव यांनी आपले नामांकन दाखल केले. त्यामुळे मतदान प्रक्रिया राबविण्यात आली. २३ सदस्य संख्या असलेल्या या झोनमधून वनिता डुकरे यांना ११ तर रंजना यादव यांना १२ मते मिळाली. बसपाच्या रंजना यादव यांनी सभापती म्हणून घोषित करण्यात आले. त्यानंतर झोन क्रमांक २ साठी नामांकन मागविण्यात आले; मात्र येथे भाजपाचे देवानंद वाढई यांचे एकमेव नामांकन असल्याने त्यांना झोन क्रमांक २ चे सभापती घोषित करण्यात आले.
झोन क्रमांक ३ मध्येही भाजपाच्या आशा आबोजवार यांचे एकमेव नामांकन असल्याने त्यांनाही अविरोधी विजयी घोषित करण्यात आले.

काँग्रेसचा
बसपाला पाठिंबा
महानगरपालिका निवडणुकीत काँग्रेसला अपेक्षेप्रमाणे विजय संपादन करता आला नाही. दरम्यान, आज गुरुवारी झालेल्या झोन सभापती पदाच्या निवडणुकीत काँग्रेसने आपला उमेदवार उभा केला नाही. उलट बसपाच्या उमेदवारांना काँग्रेसने पाठिंबा दिला. यामुळे झोन क्रमांक ३ मधून बसपाच्या रंजना यादव यांचा विजय झाला.

 

Web Title: Appearance, increase, Yadav Chairman

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.