वॉलमार्ट विरोधात निवेदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2018 23:18 IST2018-05-15T23:18:24+5:302018-05-15T23:18:24+5:30

अखिल भारतीय ग्राहक पंचायत संघटनेद्वारे संपूर्ण भारत देशात वॉलमार्टने फ्लीपकार्टला खरेदी करून परदेशी मालाला भारतात विकण्यास विरोध दर्शविला आहे.

Appeal against Walmart | वॉलमार्ट विरोधात निवेदन

वॉलमार्ट विरोधात निवेदन

ठळक मुद्देपंतप्रधानांना पत्र : अ.भा. ग्राहक पंचायत संघटनेकडून निषेध

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : अखिल भारतीय ग्राहक पंचायत संघटनेद्वारे संपूर्ण भारत देशात वॉलमार्टने फ्लीपकार्टला खरेदी करून परदेशी मालाला भारतात विकण्यास विरोध दर्शविला आहे. याचा एक भाग म्हणून अ. भा. ग्रा. पंचायतचे चंद्रपूर जिल्हाध्यक्ष मधुसुदन भूमकर यांनी अपर जिल्हाधिकारी सचिन कलंत्री यांच्या नेतृत्त्वातील शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांमार्फत पंतप्रधानांना निवेदन सादर करण्यात आले.
यावेळी जिल्हा कार्यकारिणीचे महानगर चंद्रपूर अध्यक्ष विनोद माढाई, उर्जानगर अध्यक्ष नंदकिशोर धडांगे, उपाध्यक्ष उर्जानगर ब्रह्मानंद शेंडे, कार्याध्यक्ष भद्रावती तथा जिल्हा ग्राहक संरक्षण परिषद अशासकीय सदस्य वामन नामपल्लीवार, सहसचिव भद्रावती विठ्ठल ढवळे, जिल्हा ग्राम संरक्षण परिषद अशासकीय सदस्य संगिता लोखंडे, चंद्रपूर महानगर महिला आघाडी प्रमुख नंदिनी चुनारकर, चंद्रपूर जिल्हा महिला कार्यकारी सदस्य सचिव भाग्यश्री भूमकर, युवा कार्यकारी सदस्य जिल्हा अर्थव भूमकर आदी उपस्थित होते.

Web Title: Appeal against Walmart

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.