ग्रामरोजगार सेवकांसाठी अंधश्रद्धा निर्मूलन कार्यक्रम

By Admin | Updated: July 8, 2014 23:23 IST2014-07-08T23:23:49+5:302014-07-08T23:23:49+5:30

येथील आनंदभवन येथे ग्रामरोजगार सेवकासाठीे अंधश्रद्धा निर्मूलन प्रबोधन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे जिल्हा कार्याध्यक्ष पी.एम. जाधव,

Anti-superstition programs for rural laborers | ग्रामरोजगार सेवकांसाठी अंधश्रद्धा निर्मूलन कार्यक्रम

ग्रामरोजगार सेवकांसाठी अंधश्रद्धा निर्मूलन कार्यक्रम

चंद्रपूर : येथील आनंदभवन येथे ग्रामरोजगार सेवकासाठीे अंधश्रद्धा निर्मूलन प्रबोधन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे जिल्हा कार्याध्यक्ष पी.एम. जाधव, सिटूचे जिल्हाप्रमुख रमेशचंद्र दहिवडे उपस्थित होते.
महाराष्ट्र शासनाने पारित केलेल्या जादूटोणा विरोधी कायद्याच्या १२ कलमाबाबत सचित्र पोस्टरच्या सहाय्याने यावेळी माहिती देण्यात आली.
जादूटोणा, भूत भानामती, करणी केल्याचा एखाद्या निरपराध व्यक्तीवर आरोप करून त्याला मारझोड करणे, अमानुष छळ करणे हा जादूटोणा विरोधी कायद्याअंतर्गत गुन्हा आहे. या कायद्याअंतर्गत दोषी आढळून आलेल्या व्यक्तीला सहा महिने ते सात वर्षापर्यंत तुरुंगवास आणि पाच हजार ते पन्नास हजार रुपयांपर्यंत आर्थिक दंडही होऊ शकतो, अश मागणी जाधव यांनी दिली.
समाजाातील ढोंगी बुवा, बाबा, महाराज, तांत्रिक- मांत्रिक लोकासमोर विज्ञानाचेच चमत्कारीक प्रयोग दाखवून हे चमत्कार अलौकीक शक्तीमुळेच घडतात. या अलौकीक शक्तीमुळेच सर्व समस्यांचे निवारण करता येते, असे आश्वासन देतात. ही निव्वळ फसवेगिरी आहे. त्यावर विश्वास ठेवू नका अशी विनंती जाधव यांनी केली.
ढोंगी लोक दाखवित असलेल्या चमत्कारीक प्रयोगापैकी काही चमत्कारीक प्रयोगांचे सादरीकरण करून त्यामागील वैज्ञानिक कारणांचा खुलासा करून दाखविण्यात आला. लोकांमध्ये चमत्काराबद्दलच्या असलेल्या शंकाचे समाधान केले. याप्रसंगी रमेशचंद्र दहिवडे म्हणाले, शहरी भागाच्या तुलनेत ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणात अंधश्रध्दा आहे. त्यामुळे आता प्रत्येकांनी जादूटोणा, भानामती यावर विश्वास न ठेवता विज्ञानावर विश्वास ठेवावा, तसेच अंधश्रध्दा निर्मूलनासाठी सर्वांना प्रयत्न करावा, असे मत व्यक्त केले.
आभार राजेश पिंजरकर यांनी मानले. कार्यक्रमासाठी श्यामसुंदर खंगार, रामजी येडमे, अंंकुश आत्राम, सुभाष भोयर, मंगला टेकाम, बंडू वाघाडे, अनिल गुरनुले, रामचंद्र बुरांडे, विशाल वाढई, आदींनी परिश्रम घेतले.(नगर प्रतिनिधी)

Web Title: Anti-superstition programs for rural laborers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.