शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

सिद्धबली इस्पात कंपनीत कामगाराचा अपघाती मृत्यूने संताप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2021 05:00 IST

मध्य प्रदेशातील शैलेंद्र नामदेव हा कामगार सिद्धबली इस्पात कंपनीत कार्यरत होता. कंपनीत  सुरक्षा अधिकारी नाहीत. मृत कामगार व इतर कामगार कर्मचाऱ्यांना हेल्मेट, सेफ्टी शूज पुरविले नाही. सिद्धबली इस्पातच्या व्यवस्थापनात बदल झाला.परंतु, कामगारांच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष केले. शैलेंद्र नामदेव यांना सुरक्षा साधने पुरविली असती तर जीव वाचला असता, असेही कामगारांचे म्हणणे आहे. 

ठळक मुद्देव्यवस्थापनावर गुन्हा दाखल करण्याची हंसराज अहीर यांची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : ताडाळी एमआयडीसी परिसरातील सिद्धबली इस्पात कंपनीत सोमवारी मध्य प्रदेशातील शैलेंद्र नामदेव या कामगाराचा अपघाती मृत्यू झाला. मात्र, व्यवस्थापनाने हे प्रकरण दडपण्याच्या हेतूने मृत कामगाराचे पार्थिव परस्पर नागपूरला हलविले आणि पोलिसांची दिशाभूल केल्याचा आरोप कामगारांनी केला. दरम्यान, व्यवस्थापनाच्या चुकीमुळे कामगाराचा मृत्यू झाल्याने कंपनीवर गुन्हा दाखल करण्याची मागणी माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांनी मंगळवारी कंपनीला भेट दिल्यानंतर केली आहे. मध्य प्रदेशातील शैलेंद्र नामदेव हा कामगार सिद्धबली इस्पात कंपनीत कार्यरत होता. कंपनीत  सुरक्षा अधिकारी नाहीत. मृत कामगार व इतर कामगार कर्मचाऱ्यांना हेल्मेट, सेफ्टी शूज पुरविले नाही. सिद्धबली इस्पातच्या व्यवस्थापनात बदल झाला.परंतु, कामगारांच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष केले. शैलेंद्र नामदेव यांना सुरक्षा साधने पुरविली असती तर जीव वाचला असता, असेही कामगारांचे म्हणणे आहे. मंगळवारी माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांनी  कंपनीतील घटनास्थळ गाठले. कामगारांच्या समस्या जाणून घेतल्या.  काही कामगारांना कंपनीने कामावरून कमी केले. त्यांना पूर्ववत घेण्याची मागणी केली. कामगार गंभीर जखमी होता तर लगेच चंद्रपुरातील वैद्यकीय सेवा का पुरविण्यात आली नाही, असा प्रश्नही अहिर यांनी उपस्थित केला. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी नांदेडकर, पोलीस निरीक्षक कासार, येरुरचे सरपंच मनोज आमटे, सोनेगाव सरपंच संजय उकीनकर, पडोली ग्रामपंचायत सदस्य विक्की लाडसे उपस्थित होते.

 

टॅग्स :Hansraj Ahirहंसराज अहिरAccidentअपघात