‘त्या’ अंगणवाडीतील पोषण आहाराची चौकशी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2018 23:30 IST2018-04-28T23:30:18+5:302018-04-28T23:30:39+5:30
येथून तीन कि.मी. अंतरावील जवराबोडी येथील अंगणवाडीत मुलींना शालेय पोषण आहार दिला जातो. त्यातील खिचडीत काही जिवंत तर काही मृत अवस्थेत अळ्या आढळून आल्या.

‘त्या’ अंगणवाडीतील पोषण आहाराची चौकशी
लोकमत न्यूज नेटवर्क
शंकरपूर : येथून तीन कि.मी. अंतरावील जवराबोडी येथील अंगणवाडीत मुलींना शालेय पोषण आहार दिला जातो. त्यातील खिचडीत काही जिवंत तर काही मृत अवस्थेत अळ्या आढळून आल्या. या प्रकरणाची शिक्षण विभागाने गंभीर दखल घेतली असून विस्तार अधिकाऱ्यांनी अंगणवाडीत येऊन चौकशीही केली आहे. चौकशी अहवाल सीईओंकडे पाठविला आहे.
पोषण आहारात अळ्या मिळाल्यानंतर पालकही घाबरले आहेत. मुलांच्या आरोग्याकडे पुर्णता दुर्लक्ष होत असल्याने याबाबतची तक्रार जवराबोडी येथील मुलांच्या पालकांनी मुख्य कार्यपालन अधिकारी, संवर्ग विकास अधिकारी, एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प अधिकारी यांच्याकडे केली आहे.
त्यानंतर शुक्रवारी विस्तार अधिकाºयांनी जावराबोडी येथील अंगणवाडीत येऊन सर्व बाबींची चौकशी केली. पोषण आहार तपासला. त्यांनी आपला अहवाल तयार करून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी यांना पाठविला आहे. यावर काय कार्यवाही होते, याकडे पालकांचे लक्ष लागले आहे.