अन् मध्य प्रदेश पोलीस रिकाम्या हाताने परतले

By Admin | Updated: April 29, 2015 01:11 IST2015-04-29T01:11:53+5:302015-04-29T01:11:53+5:30

मध्य प्रदेशातील तीन-चार वर्षापूर्वी एका हत्या प्रकरणातील फरार आरोपीला अटक करण्याकरिता मध्यप्रदेश पोलिसांच्या हत्यारबंद ....

And the Madhya Pradesh police returned empty handed | अन् मध्य प्रदेश पोलीस रिकाम्या हाताने परतले

अन् मध्य प्रदेश पोलीस रिकाम्या हाताने परतले

घुग्घुस : मध्य प्रदेशातील तीन-चार वर्षापूर्वी एका हत्या प्रकरणातील फरार आरोपीला अटक करण्याकरिता मध्यप्रदेश पोलिसांच्या हत्यारबंद पांच वाहनांच्या पथकाने फरार आरोपीच्या घरी छापा टाकला. मात्र त्यापूर्वीच आपल्या तीन भावासह फरार झाला. सदरच्या कारवाईमुळे नागरिकात मात्र प्रचंड उत्सुकता होती.
मध्य प्रदेशातील छिंदवाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत तीन-चार वर्षापूर्वी झालेल्या एका हत्याप्रकरणी काल नागपूर येथे अटक झालेल्या आरोपीचा सहकारी घुग्घुस नजिकच्या म्हातारदेवी गावाच्या सिमेतील एका घरी राहात असल्याची माहिती पोलिसाां मिळाली. त्यावरून फरार आरोपीला अटक करण्याकरिता मध्य प्रदेशातील छिंदवाडा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक चौहान, पी.आय शर्मा हत्यारबंद पोलीस वाहनासह घुग्घुस पोलीस ठाण्यात पोहचले. येथील ठाणेदार मनिष ठाकरे यांच्यासह त्या घरावर छापा टाकला. मात्र हत्या प्रकरणात एका आरोपीला अटक झाल्या बातमी फरार आरोपीला रात्रीच मिळाली. त्यामुळे चारही भावांनी काही वस्तु विकून रात्रीच फरार होण्यात य, मिळविले. सदर फरार आरोपी ताडाळी येथील रेल्वे सायडींग वर मागील अनेक वर्षापासून काम करीत असून म्हातारदेवी गाव परिसरातील एका घरी राहत होते. पोलिसांच्या या कारवाईबाबत माहिती मिळविण्यासाठी नागरिकामध्ये प्रचंड उत्सुकता होती. मात्र पोलिसांच्या पथकाला रिकाम्या हाताने परत जावे लागले. (प्रतिनिधी)

Web Title: And the Madhya Pradesh police returned empty handed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.