शहरं
Join us  
Trending Stories
1
लक्ष्मणरेषा ओलांडाल तर तुमचा विनाश अटळ, समूळ उच्चाटन करू; PM मोदींचा पुन्हा खणखणीत इशारा
2
काश्मीरचा बळकावलेला भूभाग पाकने परत करावा; भारताची आग्रही मागणी, कोणाची मध्यस्थी मान्य नाही
3
दहशतवादी मसूद अजहरच्या कुटुंबीयांना पाकिस्तान देणार १४ कोटी; विशेष 'शुहाद पॅकेज'ची घोषणा
4
डॉ. विजय दर्डा, आपला अमृतमहोत्सव शुभंकर असो...; PM नरेंद्र मोदी यांचा विशेष शुभेच्छा संदेश
5
राज ठाकरेंना उद्धव ठाकरेंपासून दूर ठेवण्याचे प्रयत्न? शिंदे गटाकडून हालचाली, चर्चांना उधाण
6
तयार होतेय 'शक्ती' चक्रीवादळ, देशभर तीन दिवस जोरदार पाऊस; पावसाची कधी आणि कुठे शक्यता?
7
लष्कराने दहशतवादी तळ नेमके शोधले तरी कसे? या शस्त्रांमुळे पाकला दयेची मागावी लागली भीक
8
ऑपरेशन सिंदूर: 'त्या' १२ दहशतवादी तळांवर कारवाईसाठी पाकवर दबाव; २१ तळांची होती भारताची यादी
9
काश्मिरात लष्कर-ए-तैयबाच्या म्होरक्यासह ३ दहशतवाद्यांचा खात्मा
10
निवृत्तीनंतर कोणतेही सरकारी पद घेणार नाहीत सरन्यायाधीश खन्ना; भूषण गवई आज पदभार स्वीकारणार
11
"कामगारच विकासाचे खरे शिल्पकार"; राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांचे प्रतिपादन
12
राज्याला रेल्वे फाटकमुक्त करणार: मुख्यमंत्री; नागपुरातील १० पुलांचेही लवकरच होणार उद्घाटन
13
उद्धवसेनेच्या माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर भाजपच्या वाटेवर? ठाकरे गटाला जय महाराष्ट्र
14
दहावीतही मुलींचा 'स्ट्राइक रेट' जबरदस्त! सीबीएसईतही कन्या 'शक्ती'
15
साईभक्तांना देणगीनुसार विशेष प्राधान्य; श्री साईबाबा संस्थानचे सुधारित सुविधा धोरण
16
पश्चिम-मध्य रेल्वेच्या नव्या मार्गांच्या कामाला गती; २९.३२ हेक्टरवरची झाडे तोडण्यास परवानगी
17
“...तर लाखो लोक संघर्षाचे बळी ठरले असते”; डोनाल्ड ट्रम्प पुन्हा भारत-पाक युद्धविरामावर बोलले
18
“२४ तासांत देश सोडा”; भारताने केली पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्यावर कठोर कारवाई
19
शेख हसीना यांच्या पक्षावर बंदी; बांगलादेशच्या निर्णयावर भारताची नाराजी, स्पष्ट केली भूमिका
20
Mumbai: मुंबईत पुन्हा मराठी- हिंदी वाद! जोपड्याचं डिलिव्हरी बॉयसोबत संतापजनक कृत्य

...अन् चंदनची हाडेच बामणीच्या जंगलात मिळाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2021 05:00 IST

चंदन महादेव नारनवरे (३२) याची पत्नी गावाला जाऊन होती. हा एकटाच फुकटनगरमध्ये झोपडी बांधून लहान मुलगा व आजीसोबत राहत होता. १० दिवसांआधी तो घरून बेपत्ता झाला म्हणून हरवल्याची तक्रार त्याच्या काकाने बल्लारपूर पोलीस स्टेशनला दिली होती. आणि बामणीची युवक मंडळी अधूनमधून त्याचा शोधही घेत होती. परंतु बामणी परिसरात वाघाचा वावर एक महिन्यापासून असल्यामुळे शोध घेण्यास अडचण होत होती.

लोकमत न्यूज नेटवर्कबल्लारपूर : बामणी परिसरातील अतिक्रमण केलेल्या जागेवर फुकटनगरमध्ये राहणाऱ्या ३२ वर्षीय चंदन नारनवरे याचे बामणीच्या जंगलात हाडे मिळाल्याने बामणीत एकच खळबळ उडाली आहे. ही घटना मंगलवारी बामणी येथील तरुणांच्या सतर्कतेने उघडकीस आली. चंदन हा दहा दिवसांपासून बेपत्ता होता. पोलीस व वनखात्याच्या चमूने लगेच घटनास्थळ गाठून जंगलात सापडलेली हाडे पोस्टमार्टेमसाठी ग्रामीण रुग्णालयात पाठविली. वाघाच्या हल्ल्यात त्याचा मृत्यू झाला असावा, असा संशय व्यक्त केला जात आहे. चंदन महादेव नारनवरे (३२) याची पत्नी गावाला जाऊन होती. हा एकटाच फुकटनगरमध्ये झोपडी बांधून लहान मुलगा व आजीसोबत राहत होता. १० दिवसांआधी तो घरून बेपत्ता झाला म्हणून हरवल्याची तक्रार त्याच्या काकाने बल्लारपूर पोलीस स्टेशनला दिली होती. आणि बामणीची युवक मंडळी अधूनमधून त्याचा शोधही घेत होती. परंतु बामणी परिसरात वाघाचा वावर एक महिन्यापासून असल्यामुळे शोध घेण्यास अडचण होत होती. मंगळवारी शोध घेताना युवकांना एका व्यक्तीची हाडे मिळाल्याची वार्ता गावात पसरली. गावकऱ्यांनी तिथे पोहोचून घटनास्थळी पडून असलेल्या कपड्यावरून ही हाडे चंदनचीच असल्याचे सांगितले. त्याला वाघानेच मारल्याचा संशय गावकऱ्यांनी व्यक्त केला.  

बामणी लावारी परिसरातील जंगलात वाघ दिसल्याचे अनेक लोकांनी व शेतकऱ्यांनी सांगितले आहे. यामुळे गावात भीतीचे वातावरण आहे. फुकटनगरमध्ये अनेकांनी घरे बांधली आहे. त्या परिसरात वाघाचा वावर असल्यामुळे त्यांना सावधही केले आहे.  - सुभाष ताजने, सरपंच, ग्रामपंचायत, बामणी 

घटनेचे गांभीर्य ओळखून वन विभागाने बामणी लावारी परिसरातील जंगलात वाघावर नजर ठेवण्यासाठी कॅमेरे लावले आहे. वनखात्याने चंदनच्या हाडाचे अवयव प्रयोगशाळेत पाठवले असून रिपोर्ट आल्यानंतरच सांगता येणार की मृत्यू कशाने झाला.  -संतोष थिपे, वन परिक्षेत्र अधिकारी, बल्लारशाह

 

टॅग्स :Tigerवाघ