अमृत पाणीपुरवठा योजनेची महापौरांसह पदाधिकाऱ्यांकडून पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2021 04:28 IST2021-03-17T04:28:36+5:302021-03-17T04:28:36+5:30

चंद्रपूर : अमृत योजनेद्वारे शहराच्या ज्या भागात पाणीपुरवठा केला जात आहे, अशा भागांची महापौर राखी संजय कंचर्लावार ...

Amrut water supply scheme inspected by the mayor and office bearers | अमृत पाणीपुरवठा योजनेची महापौरांसह पदाधिकाऱ्यांकडून पाहणी

अमृत पाणीपुरवठा योजनेची महापौरांसह पदाधिकाऱ्यांकडून पाहणी

चंद्रपूर : अमृत योजनेद्वारे शहराच्या ज्या भागात पाणीपुरवठा केला जात आहे, अशा भागांची महापौर राखी संजय कंचर्लावार यांच्यासह महापालिका पदाधिकारी तसेच आयुक्तांनी पाहणी करून काही निर्देश दिले.

या भागांचा सर्व्हे केला असता पाणीपुरवठा सुरळीत होत असलेला आढळून आला. मात्र काही ठिकाणी लिकेजेस आढळले असून कंत्राटदाराला त्यावर तात्काळ कारवाई करण्याचे निर्देश महापौरांनी दिले. अमृत पाणीपुरवठा योजनेचे काम शहरात सुरु आहे. अनेक जागी पाईपलाईन टाकण्यात आली आहे. या पाईपलाईनद्वारे ज्या परिसरात पाणीपुरवठा केला जात आहे. तिथे सुरळीत पाणीपुरवठा होतो की नाही, पाण्याचा दबाव कसा आहे, येणारे पाणी वरच्या मजल्यावर किती फोर्सने पोहचते याची माहिती घेतली.

अनेक जागी सुरळीत पाणीपुरवठा केला जात असून योग्य दबावाने पाईपलाईनद्वारे पुरवठा केला जात असल्याने घराच्या अगदी वरच्या मजल्यावरही चांगल्या फोर्सने पाणी येत असल्याचे आढळून आले. मात्र काही जागी लिकेजेस आढळून आले असून ती तात्काळ दुरुस्त करण्याचे निर्देश दिले आहे. याप्रसंगी स्थायी समिती सभापती रवी आसवानी, आयुक्त राजेश मोहिते, नगरसेवक सचिन आवारी, नगरसेवक सुभाष कासनगोट्टूवार,शहर अभियंता महेश बारई, विजय बोरीकर, संजय जोगी उपस्थित होते.

Web Title: Amrut water supply scheme inspected by the mayor and office bearers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.