शहरं
Join us  
Trending Stories
1
"हरलेल्यांनी अटी घालायच्या नसतात..."; ट्रम्पचा शस्त्रसंधी वाढवण्याचा निर्णय इराणने धुडकावला
2
India-China Big Tension: इराण युद्ध… कच्च्या तेलानं बिघडवला खेळ; भारत-चीनला झटका, आली 'ही' वाईट बातमी
3
Government Employees Strike: मंत्रालयातील निम्मे कर्मचारी संपावर, कामकाजावर मोठा परिणाम
4
आजचे राशीभविष्य - २२ एप्रिल २०२६, दांपत्य जीवनात उत्तम सुख मिळेल, सार्वजनिक सन्मान व प्रसिद्धी मिळेल
5
मुंबई फिरायला आलेली चिमुरडी गर्दीत हरवली, पोलिसांनी झटपट पावले उचलली; पालकांकडे सुखरूप सोपवले
6
गुरुपुष्यामृत २०२६: स्वामी-लक्ष्मी-शनि दोन्ही हातांनी भरघोस देतील, ३ गोष्टी करा; पुण्य-लाभ!
7
Mumbai University: Mumbai University: मुंबई विद्यापीठाच्या टी.वाय. बी.कॉम.च्या तीन विषयांच्या प्रश्नपत्रिका फुटल्या
8
US-Iran Ceasefire: इराण-अमेरिका संघर्षात मोठी घडामोड, ट्रम्प यांच्याकडून युद्धविरामाच्या मुदतीत वाढ, नाकेबंदी मात्र कायम
9
Unseasonal Rain: राज्यात शुक्रवारपर्यंत वादळी वारे, गारपीट अन् पावसाची शक्यता, नागरिकांसाठी सूचना
10
आयटी कंपन्यांमधील कामगार हिताच्या उपाय योजनांकरिता अभ्यास गट गठीत करा, कामगार मंत्र्यांचे आदेश  
11
Bombay High Court: अग्निवीराच्या कुटुंबीयांच्या याचिकेला उत्तर द्या, अन्यथा दंड ठोठावण्याचा उच्च न्यायालयाचा इशारा
12
Donald Trump: "करार करा, अन्यथा बॉम्ब टाकू" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला अखेरचा इशारा
13
Uddhav Thackeray: देश तोडण्याचा डाव विरोधी पक्षांनी उधळला, महाराष्ट्र धर्मच देशाला वाचवू शकतो: उद्धव ठाकरे
14
Mumbai Drug Party: गोळ्यांवर मर्सिडीज, ऑडी, ॲपलचा लोगो; तरुणांना ड्रग्जच्या विळख्यात ओढण्यासाठी मोठं षडयंत्र!
15
Devendra Fadnavis: ३३ टक्के महिला निवडून देईपर्यंत लढाई थांबणार नाही: देवेंद्र फडणवीस
16
...म्हणून अश्विनी बनायची रुकसाना, पोलिसांच्या सीक्रेट मिशनमुळे अनेक धक्कादायक गोष्टी समोर!
17
विशेष लेख: चिनी महिलांना हवाय नवऱ्यापासून घटस्फोट!
18
लेख: विधेयक पडले, पन्नास हजार कोटी रुपये वाचले!
19
लेख: तुमचा पिझ्झा पोहोचविणारा उन्हात होरपळतो आहे, सावधान!
20
आजचा अग्रलेख: हे नुकसान कसे मोजणार?
Daily Top 2Weekly Top 5

आंबेडकरवादी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकले

By admin | Updated: February 5, 2016 00:49 IST

हैदराबादच्या केंद्रीय विद्यापीठातील पी.एच.डी.चा संशोधक विद्यार्थी रोहित वेमुला याच्या मृत्यूला जबाबदार असणाऱ्यांवर तात्काळ कारवाई करा,...

चंद्रपूर : हैदराबादच्या केंद्रीय विद्यापीठातील पी.एच.डी.चा संशोधक विद्यार्थी रोहित वेमुला याच्या मृत्यूला जबाबदार असणाऱ्यांवर तात्काळ कारवाई करा, या मागणीसाठी आंबेडकरवादी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकले.रोहित वेमुला याच्यावर एबीव्हीपी संघटनेने खोटे-नाटे आरोप करून त्याला नक्षलवादी संबोधले. त्यावरून आमदार रामचंद्रराव, केंद्रीय मंत्री बंडारू दत्तात्रय आणि केंद्रीय मानव संसाधन मंत्री स्मृती इराणी यांनी कुलगुरू पी. आप्पाराव यांना रोहित वेमुला आणि त्याच्या चार मित्रांना विद्यापीठातून निलंबित केले. होस्टेलमधून काढले. त्यांना ग्रंथालय आणि मेसमध्ये येण्याची बंदी घातली तसेच त्याचे सात महिन्याचे विद्यावेतनही रोखले. त्यानंतर रोहित वेमुला याने होस्टेलमध्ये गळफास लावून आत्महत्या केली, असे सांगण्यात येते. पण त्याचा मृत्यू संशयास्पद आहे. तसेच मुदुराई जिल्ह्यातील एका दलिताचे शव अंतिम संस्कारासाठी मुख्य रस्त्याने नेण्यास मनाई करण्यात आली. उच्च न्यायालयाने आदेश देऊनसुद्धा स्थानिक प्रशासन व सरकारने काहीच कारवाई केली नाही आणि शेवटी पोलिसांनी त्याचे बळजबरीने जंगलात अज्ञात ठिकाणी दफन केले. हा २१ व्या शतकातील जातीवादाचा घृणास्पद प्रकार आहे.या दोन्ही अमानवी घटनांचा निषेध करण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर शतकोत्तर रौप्य जयंती महोत्सव समितीच्या वतीने मोर्चा काढण्यात आला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून दुपारी १.३० वाजता निघालेला मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर ३ वाजता धडकला. त्यानंतर जिल्हाधिकारी यांना एका शिष्टमंडळाने आपल्या मागण्याचे निवेदन दिले. त्यात बंडारू दत्तात्रय व स्मृती इराणी यांना मंत्रीमंडळातून बडतर्फ करावे, या दोन मंत्र्यांसह आमदार एन. रामचंद्रराव, कुलगुरू पी. आप्पाराव आणि एबीव्हीपीचा नेता नंदनम सुशिलकुमार यांना अ‍ॅट्रासिटी अ‍ॅक्ट व सदोष मनुष्यवधाच्या गुन्ह्याखाली अटक करावी. रोहित वेमुलाच्या कुटुंबियांना एक कोटी रुपये नुकसान भरपाई व कुटुंबातील एकाला नोकरी द्यावी. दलित प्राध्यापकांचे राजीनामे स्वीकारू नयेत. रोहितच्या मित्रावरील केसेस मागे घेऊन त्यांचे विद्यावेतन त्वरित द्यावे. तसेच मदुराई जिल्हा प्रशासनातील पोलीस आणि रेव्हेन्युच्या अधिकाऱ्यांवर अ‍ॅट्रासिटी कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवावा. या मागण्यात करण्यात आल्या. या शिष्टमंडळात प्रविण खोबरागडे, प्रा. एस.टी. चिकटे, अशोक निमगडे, अ‍ॅड. राकेश रंगारी, प्रतिक डोर्लीकर, प्रशांत रामटेके, अशोक फुलझेले, सविता कांबळे, राजू भगत, अल्का मोटघरे, सिद्धार्थ वाघमारे, शालिनी भगत, जयप्रकाश कांबळे, सत्यजित खोबरागडे, विशाल अलोणे, रवी मून, गोपी मित्रा आदींचा समावेश होता.डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून अतिशय शांततेने निघालेल्या मोर्चात महिला आणि युवकांची संख्या मोठी होती. मोर्चातील लोक ‘वेमुला अमर रहे’, ‘बंडारू दत्तात्रय व स्मृती इराणी यांना बरखास्त करा’, ‘रोहित वेमुलाच्या हत्याऱ्यांना अटक करा’ अशा घोषणा देत होते.या मोर्चात भंते कृपाशरण महाथेरो, भंत विनयबोधी, भंते अनिरूद्ध, प्रविण खोबरागडे, खुशाल तेलंग, किशोर पोतनवार, द्रोपदीबाई काटकर, अ‍ॅड. शेंडे, अ‍ॅड. उराडे, वामन सरदार, भिमलाल साव, रमेशचंद्र राऊत, तथागत पेटकर, कोमल खोब्रागडे, राजू खोबरागडे, राजेश वनकर, रवी मून, रामजी जुनघरे, हिराचंद बोरकुटे, ज्योती रंगारी, बेबीताई उईके, इंदूमती पाटील, यशोधरा पोतनवार, शंकर सागोरे, कुशाल मेश्राम, सुरेश नारनवरे, राजू किर्तक, विलास बनकर, विद्याधर लाडे, भाऊराव दुर्योधन, सुरज कदम, अ‍ॅड. लोहकरे, राजकुमार जवादे, सिद्धार्थ वाघमारे आदी प्रमुख कार्यकर्ते होते. जिल्हा कचेरीसमोर मोर्चाचे रूपांतर सभेत झाले. (शहर प्रतिनिधी)