सहाही विधानसभा संघाच्या अंतिम मतदार याद्या जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2019 06:00 IST2019-09-27T06:00:00+5:302019-09-27T06:00:25+5:30

निवडणूक प्रक्रियेमध्ये सुसूत्रता आणण्यासाठी आणि मतदारांच्या निवडणुकी संदर्भातील समस्या सोडवण्यासाठी निवडणूक आयोगाने १९५० हेल्पलाईन निर्माण केली आहे. त्यामुळे मतदारांना कधीही माहिती मिळण्यास मदत होणार आहे. या हेल्पलाईन अंतर्गत राज्यस्तरावर राज्य संपर्क केंद्र तसेच जिल्हा संपर्क केंद्र स्थापन करण्यात आले आहे. १

Also announces the final voter lists of the Assembly | सहाही विधानसभा संघाच्या अंतिम मतदार याद्या जाहीर

सहाही विधानसभा संघाच्या अंतिम मतदार याद्या जाहीर

ठळक मुद्देमतदारांनो नावे तपासा : स्थानिक स्वराज संस्थेतही राहणार याद्या

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यात २१ ऑक्टोंबर रोजी मतदान होणार असून जिल्ह्यातील सर्व विधानसभा मतदारसंघाच्या सुधारित अंतिम मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत, अशी माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी दिली.
चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा, चंद्रपूर, बल्लारपूर, ब्रह्मपुरी, चिमूर व वरोरा या सहा विधानसभा मतदारसंघातील मतदान केंद्राच्या याद्या जिल्ह्यातील सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, जिल्हा परिषद, पंचायत समिती, चंद्रपूर शहर महानगरपालिका, नगरपरिषद नगरपंचायत व ग्रामपंचायतीच्या कार्यालयात तसेच संबंधित मतदान केंद्रावर नागरिकांना पाहण्याकरिता उपलब्ध करून देण्यात आल्या आहे. नागरिकांनी मतदार याद्यांमध्ये स्वत:चे नाव आहे काय, याची खात्री करून घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी केले आहे.

प्रशासनाच्या हेल्पलाईनवर आतापर्यंत १४५ तक्रारी
निवडणूक प्रक्रियेमध्ये सुसूत्रता आणण्यासाठी आणि मतदारांच्या निवडणुकी संदर्भातील समस्या सोडवण्यासाठी निवडणूक आयोगाने १९५० हेल्पलाईन निर्माण केली आहे. त्यामुळे मतदारांना कधीही माहिती मिळण्यास मदत होणार आहे. या हेल्पलाईन अंतर्गत राज्यस्तरावर राज्य संपर्क केंद्र तसेच जिल्हा संपर्क केंद्र स्थापन करण्यात आले आहे. १९ सप्टेंबरपासून आतापर्यंत या हेल्पलाईनवर १४५ तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. चंद्रपूरमध्ये १९५० हेल्पलाईन व मदत केंद्राचे स्वतंत्र कक्ष जिल्हा नियोजन भवन येथे स्थापन केलेले आहे. या टोल फ्री हेल्पलाईनवर मदतीच्या सेवेचा २४ तास लाभ देत आहे. या हेल्पलाइन व मदत सेवेमध्ये नागरिकांना निवडणूक आणि मतदानासंबंधीची माहिती मिळवता येते. मतदारांच्या विविध शंकांचे समाधान करण्यात येते. मतदान यादीत नाव नोंदवायचे असल्यास काय करावे, याबाबतीत मार्गदर्शन, मतदान ओळखपत्र, मतदान अर्ज निगडीत सर्व माहिती, मराठी, हिंदी, इंग्रजी या तिन्ही भाषांमध्ये उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. आपले मतदान कक्ष कुठे याची खात्री करण्यासाठी या हेल्पलाईनचा उपयोग होतो. मतदानाच्या दिवशी गोंधळ उडू नये, यासाठी या हेल्पलाईनचा वापर करावा, अशी विनंती प्रशासनाने केली आहे. या हेल्पलाईनच्या सहाय्याने मतदार नोंदणीसाठी संबंधितांना अधिकृत माहिती मिळविणे सोपे झाले आहे. मतदान यादीतील त्यांच्या वैयक्तिक माहितीचा तपशील, मतदान केंद्र, बूथ लेव्हल अधिकारी, निवडणूक नोंदणी अधिकारी आणि जिल्हा निवडणूक अधिकारी यांचे संपर्क क्रमांक याविषयी मतदार हेल्पलाईन, मोबाइल अ‍ॅप किंवा १९५० हेल्पलाइनवर फोन करून मिळविता येते.

प्रशासनाच्या निवडणुकीसंदर्भातील हेल्पलाईनवरून मतदारांना सर्व माहिती पुरविली जाते. जिल्ह्यातील नागरिकांनी या हेल्पलाईनचा मोठया प्रमाणात लाभ घ्यावा.
- डॉ. कुणाल खेमनार,
जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी, चंद्रपूर.

Web Title: Also announces the final voter lists of the Assembly

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.