पोलिसांचे ऑलआऊट ऑपरेशन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2020 05:01 IST2020-07-26T05:00:00+5:302020-07-26T05:01:13+5:30

मात्र तरीसुद्धा अनेकजण नियमांचे उल्लंघन करीत आहेत. त्यामुळे जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांच्या मार्गदर्शनात ऑल आऊट ऑपरेशन सुरु करण्यात आले आहे. त्यानुसार पोलिसांनी शुक्रवारी विविध ठिकाणी कारवाई करण्यात आली. त्यामध्ये विना मास्क फिरणाºया ७४५ जणांवर कारवाई करुन सुमारे एक लाख ४८ हजार १०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

Allout operation of the police | पोलिसांचे ऑलआऊट ऑपरेशन

पोलिसांचे ऑलआऊट ऑपरेशन

ठळक मुद्देएक हजार २४ जणांवर कारवाई। दोन लाख सात हजारांचा दंड वसूल

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : लॉकडाऊनचे उल्लंघन करणाऱ्या विरोधात पोलिसांनी शुक्रवारपासून ऑल आऊट ऑपरेशन सुरु केले आहे. यानुसार पोलिसांनी सुमारे १०२४ जणांवर कारवाई करुन सुमारे दोन लाख सात हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे.
चंद्रपूर जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे विनाकारण घराच्या बाहेर निघू नये, सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन करावे, मास्क घालूनच बाहेर पडावे, अशा सुचना प्रशासनातर्फे देण्यात आल्या आहे.
मात्र तरीसुद्धा अनेकजण नियमांचे उल्लंघन करीत आहेत. त्यामुळे जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांच्या मार्गदर्शनात ऑल आऊट ऑपरेशन सुरु करण्यात आले आहे. त्यानुसार पोलिसांनी शुक्रवारी विविध ठिकाणी कारवाई करण्यात आली. त्यामध्ये विना मास्क फिरणाऱ्या ७४५ जणांवर कारवाई करुन सुमारे एक लाख ४८ हजार १०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ५४ जणांवर कारवाई करुन १२ हजार २०० रुपये तर इतर २२५ कारवाी करुन ४६ हजार ७०० रुपये असा एकूण १०२४ कारवाई करुन दोन लाख सात हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनातर्फे निर्गमित केलेल्या संचारबंदी आदेशाचे पालन करावे, तसेच मास्क घालूनच बाहेर पडावे, फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करावे.

- डॉ. महेश्वर रेड्डी, जिल्हा पोलीस अधीक्षक, चंद्रपूर

Web Title: Allout operation of the police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.