शहरं
Join us  
Trending Stories
1
"हरलेल्यांनी अटी घालायच्या नसतात..."; ट्रम्पचा शस्त्रसंधी वाढवण्याचा निर्णय इराणने धुडकावला
2
India-China Big Tension: इराण युद्ध… कच्च्या तेलानं बिघडवला खेळ; भारत-चीनला झटका, आली 'ही' वाईट बातमी
3
Government Employees Strike: मंत्रालयातील निम्मे कर्मचारी संपावर, कामकाजावर मोठा परिणाम
4
आजचे राशीभविष्य - २२ एप्रिल २०२६, दांपत्य जीवनात उत्तम सुख मिळेल, सार्वजनिक सन्मान व प्रसिद्धी मिळेल
5
मुंबई फिरायला आलेली चिमुरडी गर्दीत हरवली, पोलिसांनी झटपट पावले उचलली; पालकांकडे सुखरूप सोपवले
6
गुरुपुष्यामृत २०२६: स्वामी-लक्ष्मी-शनि दोन्ही हातांनी भरघोस देतील, ३ गोष्टी करा; पुण्य-लाभ!
7
Mumbai University: Mumbai University: मुंबई विद्यापीठाच्या टी.वाय. बी.कॉम.च्या तीन विषयांच्या प्रश्नपत्रिका फुटल्या
8
US-Iran Ceasefire: इराण-अमेरिका संघर्षात मोठी घडामोड, ट्रम्प यांच्याकडून युद्धविरामाच्या मुदतीत वाढ, नाकेबंदी मात्र कायम
9
Unseasonal Rain: राज्यात शुक्रवारपर्यंत वादळी वारे, गारपीट अन् पावसाची शक्यता, नागरिकांसाठी सूचना
10
आयटी कंपन्यांमधील कामगार हिताच्या उपाय योजनांकरिता अभ्यास गट गठीत करा, कामगार मंत्र्यांचे आदेश  
11
Bombay High Court: अग्निवीराच्या कुटुंबीयांच्या याचिकेला उत्तर द्या, अन्यथा दंड ठोठावण्याचा उच्च न्यायालयाचा इशारा
12
Donald Trump: "करार करा, अन्यथा बॉम्ब टाकू" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला अखेरचा इशारा
13
Uddhav Thackeray: देश तोडण्याचा डाव विरोधी पक्षांनी उधळला, महाराष्ट्र धर्मच देशाला वाचवू शकतो: उद्धव ठाकरे
14
Mumbai Drug Party: गोळ्यांवर मर्सिडीज, ऑडी, ॲपलचा लोगो; तरुणांना ड्रग्जच्या विळख्यात ओढण्यासाठी मोठं षडयंत्र!
15
Devendra Fadnavis: ३३ टक्के महिला निवडून देईपर्यंत लढाई थांबणार नाही: देवेंद्र फडणवीस
16
...म्हणून अश्विनी बनायची रुकसाना, पोलिसांच्या सीक्रेट मिशनमुळे अनेक धक्कादायक गोष्टी समोर!
17
विशेष लेख: चिनी महिलांना हवाय नवऱ्यापासून घटस्फोट!
18
लेख: विधेयक पडले, पन्नास हजार कोटी रुपये वाचले!
19
लेख: तुमचा पिझ्झा पोहोचविणारा उन्हात होरपळतो आहे, सावधान!
20
आजचा अग्रलेख: हे नुकसान कसे मोजणार?
Daily Top 2Weekly Top 5

अपंग लाभार्थी शिबिरात साहित्य वाटप

By admin | Updated: March 24, 2015 00:39 IST

भारत सरकारच्या उपक्रमाअंतर्गत ३११ गरजू अपंग लाभार्थ्यांना सोमवारी येथे एका कार्यक्रमात साहित्य वाटप करण्यात आले.

चंद्रपूर : भारत सरकारच्या उपक्रमाअंतर्गत ३११ गरजू अपंग लाभार्थ्यांना सोमवारी येथे एका कार्यक्रमात साहित्य वाटप करण्यात आले. जि.प. अध्यक्षा संध्या गुरनुले, महापौर राखी कंचर्लावार, जिल्हाधिकारी डॉ. दीपक म्हैसेकर, उपविभागीय अधिकारी संजय दैने व तहसीलदार गणेश शिंदे उपस्थित होते.जिल्ह्यातील अपंग गरजू व्यक्तींना आधार मिळण्याच्या दृष्टीकोनातून भारत सरकारच्या उपक्रमाअंतर्गत भारतीय कृत्रिम अंग निर्माण निगम (एलिम्को) जबलपूर अंतर्गत, आरोग्य विभाग जि.प. चंद्रपूर, सामान्य रुग्णालय चंद्रपूर, समाज कल्याण कार्यालय जि.प. चंद्रपूर, आय.एम.ए. रोटरी क्लब चंद्रपूर व सुशिलाबाई रामचंद्रराव मामिडवार समाजकार्य महाविद्यालय पडोली चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने स्थानिक ज्युबिली हायस्कूलमध्ये अपंगत्व निदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. सदर अपंगत्व निदान शिबिरात आर्टीफीशियल मॅन्युफॅक्चरींग कार्पोरेशन आॅफ इंडिया (एलिम्को) जबलपूर येथील विशेषज्ज्ञ अखिलेश मौर्य, प्रोथेस्टीक अ‍ॅन्ड अर्थोस्टी (एलिम्को) जबलपूर विपीन सिंग रावत, मार्केटींग एक्झीकुटीव्ह एलीम्को मुंबई या विशेषज्ञांसह व त्यांच्या चमूने अपंगत्व निदान शिबिरात अपंग, बधिर, अंध आदीची तपासणी केली. व ज्या गरजु अपंग व्यक्तीला साहित्याची आवश्यकता आहे त्यांची नोंद घेतली.सदर शिबिरात एकुण ३११ गरजु अपंग लाभार्थ्यांना २० मार्च रोजी जिल्हा परिषद अध्यक्षा संध्या गुरनुले, महापौर राखी कंचर्लावार, जिल्हाधिकारी दीपक म्हैसेकर, यांच्या हस्ते अपंग लाभार्थ्यांना तीन चाकी सायकल, व्हीलचेअर, कुबडी, कृत्रिम हात, पाय, अंध काठी, श्रवण यंत्र, वॉकर, कॅलीपर, क्रचेस आदी साहित्याचे मोफत वाटप करण्यात आले. सदर कार्यक्रमाप्रसंगी मान्यवरांची विशेष मार्गदर्शनपर भाषणे झाली.सदर कार्यक्रमाप्रसंगी संध्या गुरनुले यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात असे शिबिर अपंग, मतीमंद, नैसर्गिक व अपघाताद्वारे होणाऱ्या अपंग गोरगरीब जनतेसाठी नेहमीच होणे गरजेचे आहे. त्यामुळे अपंगाना समाजात सन्मानाने जीवन जगता येईल, असे सांगितले.सदर अपंग लाभार्थी शिबिर साहित्य वाटप कार्यक्रमात जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. श्रीराम गोगुलवार, सहाय्यक संचालक (कुष्ठरोग) डॉ. दीपक सेलोकर, जिल्हा शल्य चिकीत्सक पी.बी. मुरंबीकर, समाज कल्याण अधिकारी विजय वाकुलकर, आयएमएचे राज्य उपाध्यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे, ज्युबिला हायस्कूलचे प्राचार्य उद्धव डांगे, व जबलपूर येथील विशेषज्ञ अखिलेश मौर्य, विपीन सिंग रावत यावेळी उपस्थित होते.यावेळी जबलपूर येथील टिमने अपंग लाभार्थ्यांना साहित्याचा वापर कसा करायचा याबाबत मार्गदर्शन केले. तसेच वितरीत करण्यात आलेल्या साहित्याचे व्यवस्थित सेटींग करून लाभार्थ्यास दिले.सदर शिबिराच्या यशस्वीतेकरिता आरोग्य विभागाचे कर्मचारी, तसेच ज्युबिली हायस्कूलमधील शिक्षक तथा शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी अथक परिश्रम घेतले. (प्रतिनिधी)