अल्का मोटघरे समाजभूषण पुरस्काराने सन्मानित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2021 04:34 IST2021-09-08T04:34:24+5:302021-09-08T04:34:24+5:30
------- रोटरी क्लबतर्फे आदर्श शिक्षकांचा सन्मान चंद्रपूर : रोटरी क्लब ऑफ चंद्रपूरच्या वतीने शिक्षक दिनाचे औचित्य साधून जिल्ह्यात आदर्श ...

अल्का मोटघरे समाजभूषण पुरस्काराने सन्मानित
-------
रोटरी क्लबतर्फे आदर्श शिक्षकांचा सन्मान
चंद्रपूर : रोटरी क्लब ऑफ चंद्रपूरच्या वतीने शिक्षक दिनाचे औचित्य साधून जिल्ह्यात आदर्श शिक्षकांचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गोंडवाना विद्यापीठाचे माजी कुलगुरु डॉ. विजय आईचवार, तर प्रमुख पाहुणे म्हणून शफिक अहमद यांची उपस्थिती होती. यावेळी डॉ. आईंचवार म्हणाले, शिक्षकांची विद्यार्थ्यांबद्दल असलेली आस्ता, शिक्षकांचे वागणे कसे असावे याबाबत मार्गदर्शन केले. विद्यार्थी शिक्षकांचे अनुकरण करीत असतो. त्यामुळे शिक्षकाने अतिशय जबाबदारीने वागले पाहिजे, असे आवाहन केले. प्रा. डॉ. योगेश दुधपचारे यांनी शिक्षकांच्या समस्यांबाबत मार्गदर्शन केले. तसेच भावना टेकाम यांनीसुद्धा मार्गदर्शन केले. त्यानंतर पाहुण्यांच्या हस्ते आदर्श शिक्षकांचा ट्रॉफी व प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला. प्रास्ताविक प्रोजेक्ट डायरेक्टर प्राचार्य स्मिता ठाकरे संचालन अनुप यादव, तर आभार सेक्रेटरी अविनाश उत्तरवार यांनी केले. आयोजनासाठी क्लबचे अध्यक्ष श्रीकांत रेशीमवाले यांच्यासह क्लबच्या सदस्यांनी प्रयत्न केले.