शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरेंच्या 13 पैकी 5-6 आमदार शिंदेंच्या संपर्कात, खासदारही; फसलेल्या सभेवरून किरण सामंतांचा दावा
2
नाशिकमध्ये महायुतीचा उमेदवार ठरला? शांतीगिरी महाराजांच्या अर्जावर शिंदे शिवसेना असा उल्लेख, अर्ज भरला
3
'मोदी तुमच्या आरक्षणाचे रक्षण करेल; सर्वाधिक ST खासदार भाजपचे', PM मोदींची काँग्रेसवर टीका
4
'घरच्यांना सांग सुखरुप निघालो', राज ठाकरे संकर्षणला असं का म्हणाले? 'त्या' कवितेनंतर घेतली भेट
5
Ana Brumwell Photos: कोण आहे RCBचा शतकवीर Will Jacksची गर्लफ्रेंड अ‍ॅना ब्रुमवेल? जाणून घ्या या सौंदर्यवतीबद्दल
6
आता कळेलच की जनता कोणासोबत, असली कोण आणि नकली कोण; गजानन कीर्तीकरांचे वक्तव्य
7
“औरंगजेब-याकुबचा उदो उदो करण्यापेक्षा रामराम करणे कधीही चांगले”; बावनकुळेंची ठाकरेंवर टीका
8
Rahul Gandhi : "कोणत्याही महिलेला मंगळसूत्र गहाण ठेवावं लागणार नाही"; राहुल गांधींचं 25 लाखांचं आश्वासन
9
आईवडिलांच्या घटस्फोटावर पहिल्यांदाच व्यक्त झाली क्षिती जोग, म्हणाली, "मला आनंद झाला..."
10
"मोदींनी छत्रपतींचे विचार आत्मसात केले", उदयनराजेंनी सांगितलं 'पॉलिवूड', मोठ्या चुकीची कबुली
11
काँग्रेसला दुसरा धक्का: उमेदवाराने ऐनवेळी अर्ज मागे घेत भाजपमध्ये केला प्रवेश
12
“देशात परिस्थिती बदलली, भाजपाविरोधी लाट, महायुती अडचणीत”: बाळासाहेब थोरात
13
Shiv Puja: महादेवाला नेहमी बेल आणि पांढरे फुल वाहावे, पण केतकीचे फुल कदापि नाही; वाचा कारण!
14
VIDEO: मुलाने १५ सेकंदात वडिलांना २५ बुक्के मारले; हार्ट अटॅकने जन्मदात्याचा मृत्यू
15
Vastu Tips: जिथे कमळ फुलते तिथे सौभाग्यलक्ष्मी नांदते; पहा चुंबकाप्रमाणे पैसा आकर्षून घेणारी रोपं!
16
Mumbai Local News BREAKING: हार्बर रेल्वे ठप्प! सीएसएमटी स्थानकाजवळ लोकलचा डबा घसरला, प्रवाशांची तारांबळ
17
PM कुणीही असला तरी भारतीय अर्थव्यवस्था..., मोदींनी फुकट बढाया मारू नयेत, चिदंबरम यांचा टोला
18
अखेर इस्रायल-हमास भीषण युद्ध संपणार? तीन देशांच्या प्रयत्नानंतर आज महत्त्वाची घोषणा होण्याची शक्यता
19
नारायण राणे जिंकले नाहीत तर प्रचार कायमचा सोडणार; कट्टर राणे समर्थकाने घेतली शपथ, केला मताधिक्याचा दावा
20
चिंताजनक! जास्त मीठ खाणं ठरू शकतं मृत्यूचं कारण; वेळीच व्हा सावध, धडकी भरवणारा रिपोर्ट

दारूविक्रेत्यांचा हल्ला, १२ जणांवर गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2019 9:49 PM

येथील सोमनाथपूर चौकातील येलुकापल्ली यांचे दुकान व घरावर हल्ला केल्याप्रकरणी १२ आरोपींविरुध्द राजुरा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कराजुरा : येथील सोमनाथपूर चौकातील येलुकापल्ली यांचे दुकान व घरावर हल्ला केल्याप्रकरणी १२ आरोपींविरुध्द राजुरा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.दारू विक्रीविषयी पोलिसांना माहिती दिली, या संशयातून २२ मार्चला रात्री ८ वाजता सोमनाथपूर वॉर्डातील काही अवैध दारु विक्रेत्यांनी पत्रकार अंजन व राजेंद्र येलुकापल्ली यांच्या घरावर हल्ला केला. यावेळी दगड व विटांचा मारा केल्याने दुकानाचा दर्शनी भाग तुटला. तसेच मोटारसायकलची तोडफोड केली. घटनेची तक्रार पोलीस ठाण्यात केल्यावर विनोद उर्फ पापा जाधव, अविनाश कोहपरे, सुरेंद्र चौधरी, गौरव पोहनकर, कैलाश पवार, अंजूम, अशफाक व इतर पाच अशा १२ आरोपींविरुध्द दखलपात्र गुन्हा नोंदविण्यात आला. या आरोपींना अद्याप अटक झालेली नाही. प्रभारी ठाणेदार चंद्रशेखर बहादूरे व पीएसआय राहुल जवंजाळ अधिक तपास करीत आहेत. दरम्यान, राजुरा तालुका पत्रकार संघाचे सदस्य अंजय येलुकापल्ली यांच्या घरावर झालेल्या या हल्ल्याचा तालुका पत्रकार संघाने निषेध केला आहे. उपविभागिय अधिकारी योगेश कुंभेजकर, उपविभागीय पोलीस अधिकारी शेखर देशमुख यांना निवेदन देऊन कडक कारवाई करण्याची मागणी केली. यावेळी बि. यू.बोर्डेवार, सचिव अनिल बाळसराफ, डॉ. उमाकांत धोटे, मोहन शर्मा आदी उपस्थित होते.चौकात पोलीस बंदोबस्तसोमनाथपूर वॉर्डात दारुविक्रेत्यांची हिंमत चांगलीच वाढली आहे. घटनेनंतरही येथे दारुविक्रेत्यांचा उपदव्याप कमी झालेला नाही. त्यामुळे सोमनाथपूर चौकात कडक बंदोबस्त ठेवण्याचे आदेश उपविभागिय अधिकारी शेखर देशमुख यांनी दिले आहे. आदेशानुसार चौकात २४ तास पोलीस तैनात केले आहेत.