सीएमआरच्या माध्यमातून एड्स जनजागृती कार्यक्रम

By Admin | Updated: August 14, 2015 01:25 IST2015-08-14T01:25:38+5:302015-08-14T01:25:38+5:30

अंबुजा सिमेंट कंपनी, उपरवाही ता. कोरपना, जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण पथक, सामान्य रुग्णालय व नोबल शिक्षण संस्था, आश्रय ट्रकर्स प्रकल्प यांच्या संयुक्त विद्यमाने अंबुजा कंपनी

AIDS awareness program through CMR | सीएमआरच्या माध्यमातून एड्स जनजागृती कार्यक्रम

सीएमआरच्या माध्यमातून एड्स जनजागृती कार्यक्रम

चंद्रपूर : अंबुजा सिमेंट कंपनी, उपरवाही ता. कोरपना, जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण पथक, सामान्य रुग्णालय व नोबल शिक्षण संस्था, आश्रय ट्रकर्स प्रकल्प यांच्या संयुक्त विद्यमाने अंबुजा कंपनी येथील ट्रान्सपोर्टनगर येथे कंपनीतील ट्रक ड्रायव्हर जनजागृती संदर्भात एम्प्लॉयर लिड मॉडल या नवीन कार्यक्रमाचे उद्घाटन करुन कार्यक्रमाला सुरुवात केली. महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्था मुंबई यांनी कंपनीतील मायग्रंन्ट व ट्रकर्स कामगारांसाठी कंपनीच्या सीएसआर निधीतून काही खर्च हा एचआयव्ही एड्स जनजागृती व आरोग्य तपासणीकरिता वापरुन नियमित कार्यक्रम घेण्याचा निर्णय घेण्यात आला.
त्याअनुषंगाने अंबुजा सिमेंट कंपनी येथील ट्रान्सपोर्टनगर येथे सकाळी एचआयव्ही, एआयडीएस जनजागृती, माहिती पत्रक वाटप, पोस्टर प्रदर्शन, कन्डोम वापराविषयी जनजागृती तसेच ट्रक ड्रायव्हर व हेल्पर यांची आरोग्य तपासणी करण्यात आली. त्यामध्ये नेत्र तपासणी, शुगर, ब्लड प्रेशर व गुप्तरोग तपासणी करण्यात आली. या शिबिराचा एकूण ४५ ट्रक ड्रायव्हर व हेल्पर यांनी लाभ घेतला.
याप्रसंगी अंबुजा सिमेंट हॉस्पिटल उपरवाहीचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रकाश पोखरना, जिल्हा पर्यवेक्षक निरंजन मंगरुळकर, नेत्रतज्ज्ञ डॉ. अलोक दोषी, डॉ. पंकज येरणे ट्रकर्स प्रकल्पाचे प्रकल्प व्यवस्थापक रोशन आकुलवार, प्रकल्प व्यवस्थापक राकेश पालीवार, अंबुजा सिमेंट हॉस्पिटलचे दिनेश उपाध्याय, आयरिस पोतरला, प्रमोद मोहुर्ले, किशोर चौधरी, अंजूला रॉय व शिल्पा साळवे यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता अनिल उईके, अविनाश सोमनाथे, सनी वरखडे, सुनिल खांडरे, पवन कांत, संजय दुर्गे यांनी परिश्रम घेतले. यावेळी ट्रकचालकांना मार्गदर्शनही करण्यात आले. (शहर प्रतिनिधी)

Web Title: AIDS awareness program through CMR

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.