वाघाच्या बंदोबस्तासाठी राजुऱ्यात आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2019 05:00 IST2019-12-24T05:00:00+5:302019-12-24T05:00:38+5:30
राजुरा तालुक्यात शेतकऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. सद्यास्थितीत कापूस वेचणी, धान चुरणे, तुर तोडणी सुरु आहे. त्यामुळे अनेक शेतकरी व मजूर शेतात जात आहेत. मात्र मागील महिनाभरापासून या परिसरात वाघाचा धुमाकूळ सुरु आहे. परंतु पिकांच्या संरक्षणासाठी शेतकरी व मजूर शेतात जात आहेत. परिणामी त्यांचा जीव धोक्यात आहे.

वाघाच्या बंदोबस्तासाठी राजुऱ्यात आंदोलन
लोकमत न्यूज नेटवर्क
गोवरी : राजुरा तालुक्यात वाघाची दहशत आहे. त्यामुळे शेतकरी, शेतमजुर, नरभक्षक वाघाच्या दहशतीमध्ये आपला जीव मुठीत घेऊन शेतात जातात. त्यामुळे नरभक्षक वाघाचा बंदोबस्त करावा या मागणीसाठी शेतकऱ्यांच्यावतीने वनपरिक्षेत्राधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून धरणे आंदोलन करण्यात आले.
राजुरा तालुक्यात शेतकऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. सद्यास्थितीत कापूस वेचणी, धान चुरणे, तुर तोडणी सुरु आहे. त्यामुळे अनेक शेतकरी व मजूर शेतात जात आहेत. मात्र मागील महिनाभरापासून या परिसरात वाघाचा धुमाकूळ सुरु आहे. परंतु पिकांच्या संरक्षणासाठी शेतकरी व मजूर शेतात जात आहेत. परिणामी त्यांचा जीव धोक्यात आहे. वाघाचा बंदोबस्त करावा यासाठी शेतकऱ्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून मोर्चा काढला. याप्रसंगी प्रदीप बोबडे, विठ्ठल बदखल, सुनील मुसळे, दिनेश पारखी, बालाजी भोंगळे, मेघा धोटे यांनी मार्गदर्शन केले. त्यानंतर वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. सदर आंदोलनात संतोष दोरखंडे, योगेश आपटे, अरविंद वांढरे, महादेव चापले, सच्चिदानंद रामटेके, अमोल राऊत, भास्करराव वांढरे, दादाजी राऊत, प्रकाश ताजणे, महेश धोंगळे, सुभाष साळवे, नानाजी ढवस, नत्थू धोंगळे, देविदास कावळे यांच्यासह अनेक शेतकरी सहभागी झाले होते.