शहरं
Join us  
Trending Stories
1
महिलांना तालावर नाचायला लावणाऱ्या औषधाबाबत गूढ; भोंदू खरात नेमकं काय प्यायला द्यायचा?
2
पंजाबविरुद्धच्या लढतीदरम्यान ड्रेसिंग रूमध्येच केलं स्मोकिंग, रियान पराग अडचणीत, व्हिडीओ व्हायरल
3
ओपेक'मध्ये फूट! सौदीशी पंगा आणि इराणचा धोका; संयुक्त अरब अमिरातीने का सोडली जगाची 'तेल संघटना'?
4
PSL 2026: बाबर आझमचे वादळी शतक! तब्बल ७ वर्षांनी केला पुन्हा 'तो' पराक्रम; संघही फायनलमध्ये
5
उष्णतेचा दुहेरी तडाखा! दिवस आणि रात्रीही लाहीलाही; हवामान विभागाने दिला मोठा इशारा
6
डिजिटल पेमेंट, ट्रान्झॅक्शन, म्युच्युअल फंड.., १ मे पासून काय काय बदलणार? तुमच्या खिशावर होणार थेट परिणाम
7
मतदार छाननीत गडचिरोलीची आघाडी; मुंबईसह पुणे, ठाणे, नागपूर पिछाडीवर
8
तुमच्याकडे राजकीय इच्छाशक्तीचा अभाव; फेरीवाल्यांच्या अतिक्रमणावरून हायकोर्टाचे सरकारला खडे बोल
9
राशीभविष्य २९ एप्रिल २०२६: मेष, वृश्चिक राशीवर होणार धनाचा वर्षाव; कुंभ, तूळ राशीसाठी आजचा दिवस संघर्षाचा
10
प्रभागात ९७ टक्के मुस्लिम मतदार, तरीही अपक्ष हिंदू महिलेने मारली बाजी, मिळवला दणदणीत विजय
11
निवडणुकीतील मतदान संपताच नागरिकांना झटका बसणार; पेट्रोल-डिझेल ५ रुपयांनी महागण्याची शक्यता
12
जर्मनीत अंतराळवीरांना १०० दिवसांचा एकांतवास! त्यांनी काही मोठा गुन्हा केला आहे का?
13
CSK फ्रँचायझीकडून MI विरुद्ध केला होता मोठा पराक्रम! तोच Donovan Ferreira झाला RR चा 'बाहुबली'
14
बापरे, हा काय प्रकार! हाय हिल्स घालून अक्षय कुमारचा 'लालपरी' गाण्यावर डान्स, व्हिडीओ व्हायरल
15
मिरा रोडमध्ये धर्म विचारून केला चाकू हल्ला; आराेपी जैब अन्सारी ‘लोन वुल्फ’ असण्याची शक्यता
16
विमान सेवा बंद पडण्याची भीती, कंपन्यांचे केंद्राला मदतीचे साकडे; खर्च दुप्पटीनं वाढला
17
महायुतीतील वाद उफाळला! गोकुळ दूध संघावर प्रशासक येणार; शिंदे-फडणवीस यांच्यात मतभेद?
18
१ मेपासून मराठी भाषा तपासणी मोहीम राबविणार; रिक्षा-टॅक्सीचालकांवर १५ ऑगस्टपर्यंत कारवाई नाही
19
‘आरटीईनुसार विद्यार्थी प्रवेश बंधनकारक’; सुप्रीम कोर्टाने खासगी शाळांना बजावले
20
भीषण गर्मीत मोठे वीज संकट; मागणी विक्रमी, उत्पादन निम्म्यापेक्षा कमी, नागरिक हैराण
Daily Top 2Weekly Top 5

जोरगेवार पुन्हा सत्ताधाऱ्यांसोबत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2019 06:00 IST

किशोर जोरगेवार यांनी सर्वप्रथम भाजपमध्ये राहून आपले सामाजिक कार्य सुरू केले. त्यानंतर २०१४ च्या निवडणुकीत ते आमदारीची निवडणूक लढण्यास इच्छुक होते. मात्र भाजपने त्यांना उमेदवारी दिली नाही. त्यामुळे त्यांनी शिवसेनेत प्रवेश करून २०१४ ची विधानसभा निवडणूक लढविली. यात ते पराभूत झाले. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत चंद्रपूर विधानसभा क्षेत्रासाठी काँग्रेसची तिकीट मिळावी म्हणून ते प्रयत्नशील होते. त्यांनी काँग्रेस प्रवेशही केला.

ठळक मुद्देभाजपशी ऋणानुबंध तोडले। सत्ता स्थापनेसाठी आता शिवसेनेला पाठिंबा

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : विधानसभा निवडणुका झाल्यानंतर सत्ता स्थापनेच्या सारीपाटात कोणता पक्ष कोणत्या पक्षासोबत युती करेल, हे सांगणे कठीण झाले होते. तसेच चंद्रपूरचे अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांच्याबाबतही म्हणता येईल. आमदारकीची माळ गळ्यात पडल्यानंतर लगेच तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठिंबा देणाऱ्या जोरगेवारांनी आता महाविकास आघाडीचे सरकार बसताच शिवसेनेला पाठिंबा जाहीर केला आहे. काही दिवसातच भाजपशी जोडलेले ऋणानुबंध त्यांनी संपुष्टात आणले आहे.किशोर जोरगेवार यांनी सर्वप्रथम भाजपमध्ये राहून आपले सामाजिक कार्य सुरू केले. त्यानंतर २०१४ च्या निवडणुकीत ते आमदारीची निवडणूक लढण्यास इच्छुक होते. मात्र भाजपने त्यांना उमेदवारी दिली नाही. त्यामुळे त्यांनी शिवसेनेत प्रवेश करून २०१४ ची विधानसभा निवडणूक लढविली. यात ते पराभूत झाले. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत चंद्रपूर विधानसभा क्षेत्रासाठी काँग्रेसची तिकीट मिळावी म्हणून ते प्रयत्नशील होते. त्यांनी काँग्रेस प्रवेशही केला. मात्र पक्षाने एबी फार्म महेश मेंढे यांना दिला. त्यानंतर अपक्ष म्हणून किशोर जोरगेवार रिंगणात उतरले. ते प्रचंड मताधिक्क्यांनी विजयी झाले. त्यांच्या प्रचारात कॉंग्रेस - राष्ट्रवादीचे नेते सहभागी झाल्याचे मतदारांनी बघितले. त्यामुळे अपक्ष म्हणून निवडणून आलेले आमदार जोरगेवार सत्तास्थापनेच्या खेळात कुणाला पाठिंबा देतील, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मतदारांचा कौल युतीच्या बाजुने असल्याने निकालाच्या दुसऱ्याच दिवशी जोरगेवार यांनी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठींबा जाहीर केला. त्यांच्या या निर्णयाने काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांना चांगलाच धक्का बसला. सत्तास्थापनेदरम्यान नाट्यमय राजकीय घडामोडी घडल्या. दरम्यान, २३ नोव्हेंबरला देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादीचे अजित पवार यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. बहुमतांची जुळवाजुळव करण्यासाठी भाजपला पाठिंबा देणाऱ्या सहा अपक्ष आमदारांना मुंबईतील वसईमध्ये एका रिसोर्टमध्ये ठेवण्यात आले. त्यात जोरगेवार यांचाही समावेश होता. परंतु बहुमताच्या चाचणी आधीच फडणवीस यांनी राजीनामा दिला आणि सरकार कोसळले. भाजपची सरकार येणार नाही, असे स्पष्ट झाले. त्यामुळे आमदार किशोर जोरगेवार हे अस्वस्थ होते. अशातच महाविकास आघाडीने सत्ता स्थापनेचा दावा केला. त्यामुळे आमदार किशोर जोरगेवार यांनी भाजपशी जोडलेले ऋणानुबंध संपुष्टात आणत पुन्हा शिवसेनेला पाठिंबा दिला. शनिवारी बहुमत सिध्द होत असताना आमदार जोरगेवार यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना पाठिंबा देत महाविकास आघाडीच्या बाजूने मतदान केले. चंद्रपूरच्या विकासासाठी आपण सत्तेच्या बाजूने मतदान केल्याचे आमदार जोरगेवार यांचे म्हणणे आहे.निकालानंतरच शिवसेनेने दिले होते आमंत्रणचंद्रपूर विधानसभा निवडणुकीत अपक्ष आमदार म्हणून किशोर जोरगेवार हे प्रचंड मताधिक्क्यांनी निवडून आले. निकालानंतर शिवसेनेचे खासदार कृपाल तुमाने हे चंद्रपूरला आले होते. त्यांनी आमदार किशोर जोरगेवार यांची भेट घेऊन चर्चा केली. त्यांना शिवसेनेत येण्याचे आमंत्रण दिले होते. मात्र तेव्हा आमदार जोरगेवार यांनी आपण कुणालाही पाठिंबा देण्याबाबत विचार केला नसल्याचे म्हटले होते.

टॅग्स :vidhan sabhaविधानसभा