बेमुदत उपोषणाची आश्वासनानंतर सांगता
By Admin | Updated: July 23, 2014 23:31 IST2014-07-23T23:31:48+5:302014-07-23T23:31:48+5:30
पोंभुर्णा तालुक्यातील जामखुर्द येथील ग्रामपंचायतीचे तत्कालिन सरपंच व ग्रामसेवक यांनी केलेल्या अनागोंदी व भ्रष्ट कारभाराची चौकशी करण्यासाठी ग्रामपंंचायतीचे उपसरपंच ताराचंद गेडाम यांनी

बेमुदत उपोषणाची आश्वासनानंतर सांगता
समस्या सोडविणार : जिल्हाधिकाऱ्यांचे विद्यार्थ्यांना आश्वासन
देवाडा (खुर्द) : पोंभुर्णा तालुक्यातील जामखुर्द येथील ग्रामपंचायतीचे तत्कालिन सरपंच व ग्रामसेवक यांनी केलेल्या अनागोंदी व भ्रष्ट कारभाराची चौकशी करण्यासाठी ग्रामपंंचायतीचे उपसरपंच ताराचंद गेडाम यांनी २१ जुलै रोजी ३ वाजता पोंभूर्णा पंचायत समिती कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले होते. सदर प्रकरणाची दखल घेऊन चंद्रपूरचे उपमुख्य कार्यपालन अधिकारी बोंदरे व अतिरिक्त मुख्य कार्यपालन अधिकारी केदार यांनी उपोषणस्थळी भेट देऊन सदर प्रकरणाची योग्य चौकशी करून येत्या १५ दिवसात दोषींवर कारवाई करण्याचे आश्वासन दिल्याने लिंबु शरबत घेऊन २३ जुलैला उपोषण सोडण्यात आले.
माजी सरपंचावर थकबाकी असताना वसुली किंवा चौकशी करण्यात दप्तर दिरंगाई करणाऱ्या अधिकाऱ्यांची चौकशी करण्यात यावी, तसेच लेखापरिक्षणानुसार शासकीय थकबाकी असलेल्यांना उमेदवारी अर्ज मंंजूर केलेल्या अधिकाऱ्यांची चौकशी करून कारवाई करण्यात यावी, लेखापरिक्षण अहवालानुसार तात्काळ वसुली करून शासन जमा करण्यात यावी, दोषी थकबाकी व्यक्तींवर शासकीय रकमेची अफरातफर केल्याने त्यांच्यावर फौजदारी कारवाई करण्यात यावी आदी मागण्यांच्या संदर्भात उपोषणकर्त्यांनी प्रशासनाला निवेदन दिले होते. मात्र कारवाई न झाल्याने त्यांनी उपोषणाचा मार्ग अवलंबविला होता. यापूर्वी तालुक्यातील लोकप्रतिनिधींनी उपोषण मंडपाला भेट दिली व समस्या जाणून घेतल्या. सामाजिक कार्यकर्ते गिरीधरसिंह बैस यांनीही मंडपाला भेट दिली होती.
दरम्यान सदर प्रकरणाची उपमुख्य कार्यपालन अधिकारी बोंदरे व अतिरिक्त मुख्यकार्यकारी अधिकारी केदार यांनी सदर बाबीची दखल घेऊन संबंधितांवर चौकशी करून कारवाई करण्याचे आश्वासन दिल्याने गेडाम यांनी उपोषण सोडले. (वार्ताहर)