अखेर ‘त्या’ ६० बगळ्यांना मिळाले हक्काचे घर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2018 22:33 IST2018-08-11T22:32:47+5:302018-08-11T22:33:07+5:30
नगर परिषदेच्या एका नगरसेवकांनी अमानुषपणे बगळ्यांची घरटी असलेळे बाभळीचे झाड तोडले. त्यामुळे अनेक बगळ्यांच्या पिल्ल्यांचा आधार हरविला. चिमूर वन विभागाने पंचनामा करून ती पल्ले ताब्यात घेतली. सुरक्षित स्थळी हलविले.

अखेर ‘त्या’ ६० बगळ्यांना मिळाले हक्काचे घर
लोकमत न्यूज नेटवर्क
चिमूर : नगर परिषदेच्या एका नगरसेवकांनी अमानुषपणे बगळ्यांची घरटी असलेळे बाभळीचे झाड तोडले. त्यामुळे अनेक बगळ्यांच्या पिल्ल्यांचा आधार हरविला. चिमूर वन विभागाने पंचनामा करून ती पल्ले ताब्यात घेतली. सुरक्षित स्थळी हलविले.
बीएचएनएसचे सहायक संचालक संजय करकरे आणि सौरभ दंदे यांनी पुढाकर घेऊन ब्रम्हपुरीचे डिएफओ कुलदीप सिंग व चिमूरचे वनपरिक्षेत्राधिकारी चिवंडे याच्याशी चर्चा करून पिल्लांना गोरेवाडा येथील रेस्क्यू सेंटरला पाठविण्याचा निर्णय घेतला. डिएफओ कुलदीप सिंग यांच्या मार्गदर्शनात वनविभागाचे क्षेत्र रक्षक नरड, बीएचएनएसचे स्वयंसेवक, ट्री फांडेशनचे अध्यक्ष युवराज मुरस्कर, चेतन रासेकर आदींनी गोरेवाडा येथील रेस्क्यू सेंटरला पिलांना सुखरूप सोडले.