शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
3
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
4
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
5
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
6
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
7
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
8
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
9
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
10
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
11
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
12
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
13
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
14
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
15
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
16
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
17
‘साहेब’ होऊ घातलेला बिरदेव म्हणतो, शेळ्या-मेंढ्यांना काय लाजायचं? तीच माझी ताकद
18
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
19
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
20
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन

14 वर्षानंतर शेतकऱ्यांचे हरितक्रांतीचे स्वप्न साकारणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2020 05:00 IST

बल्लारपूर वेकोलि क्षेत्रातंर्गत गोवरी परिसर कोळसा खाणींने वेढला आहे. त्यामुळे भुजल पातळी झपाट्याने खाली जात असून पाणी टंचाईचे स्वरूप गंभीर होत आहे. शेती सिंचनाखाली आणण्यासाठी माजी आमदार सुदर्शन निमकर यांच्या कार्यकाळात बंधाऱ्याच्या बांधकामाला मंजुरी मिळाली. तर माजी आमदार अ‍ॅड. वामनराव चटप यांच्या हस्ते भूमिपूजन झाले. सुभाष धोटे यांच्या कार्यकाळात बांधकामाला सुरुवात झाली. मात्र निधीअभावी बांधकाम रखडले.

ठळक मुद्देबंधाऱ्यांचे बांधकाम अंतिम टप्प्यात : तीनशे एकर जमीन ओलिताखाली येणार

  प्रकाश काळे    लोकमत न्यूज नेटवर्कगोवरी : राजुरा तालुक्यातील गोवरी येथील नाल्यावर १४ वर्षापूर्वी मंजूर झालेल्या बंधाऱ्याचे बांधकाम निधीअभावी रखडले होते. मात्र शेतकऱ्यांच्या सततच्या पाठपुराव्याला यश आल्याने सुधारीत अंदाजपत्रक तयार करुन ६७ लाखांचा निधी उपलब्ध झाला असून बांधकाम अंतिम टप्प्यात आहे. त्यामुळे जवळपास तीनशे हेक्टर जमिन सिंचनाखाली येणार असून उन्हाळ्यातील पाणीटंचाई दूर होण्यास मदत होण्याची आशा आहे.बल्लारपूर वेकोलि क्षेत्रातंर्गत गोवरी परिसर कोळसा खाणींने वेढला आहे. त्यामुळे भुजल पातळी झपाट्याने खाली जात असून पाणी टंचाईचे स्वरूप गंभीर होत आहे. शेती सिंचनाखाली आणण्यासाठी माजी आमदार सुदर्शन निमकर यांच्या कार्यकाळात बंधाऱ्याच्या बांधकामाला मंजुरी मिळाली. तर माजी आमदार अ‍ॅड. वामनराव चटप यांच्या हस्ते भूमिपूजन झाले. सुभाष धोटे यांच्या कार्यकाळात बांधकामाला सुरुवात झाली. मात्र निधीअभावी बांधकाम रखडले. माजी आमदार अ‍ॅड. संजय धोटे सुधारित बांधकामासाठी प्रधानमंत्री खनिज विकास निधी अंतर्गत स्थानिक लोकप्रतिनिधी पाठपुरावा केला. त्यानंतर अर्धवट बंधाऱ्याच्या सुधारित बांधकामासाठी लघु सिंचाई विभागाने ६७ लाखांचा अंदाजपत्रक तयार केला. व माजी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रयत्नातून निधी मंजूर झाला. त्यानंतर बंधाऱ्याच्या सुधारित बांधकामाला सुरुवात झाली आहे. तब्बल १४ वर्षाच्या कालखंडानंतर बंधारा पूर्णत्वास येत आहे. या प्रकल्पामुळे जवळपास तीनशे एकर जमीन ओलिताखाली येईल, भुजलपातळीत वाढ होण्याची अशा व्यक्त होत आहे.  

कोळसा खाणींमुळे पाण्याची पातळी घटलीबल्लारपूर वेकोलि क्षेत्रातील गोवरी, पोवनी, गोयेगोव, चिंचाली, साखरी, बाबापूर, सास्ती परिसरातील नाले दिवाळीनंतरच कोरडे पडत आहे. गोवरी गावालगतच मोठा नाला वाहतो वेकोलित मोठया प्रमाणावर पाण्याचा उपसा होत असल्यामुळे परिसरातील पाण्याची पातळी झपाटयाने खाली गेली आहे .  

१४ वर्षापासून गोवरी बंधाऱ्यांचे बांधकाम रखडले होते. त्यासाठी अनेकदा सबंधित विभागाकडे पाठपुरावा केला. त्यानंतर ६७ लाखांचा निधी मंजूर झाला असून या बंधाऱ्यांचे बांधकाम आता अंतिम टप्प्यात आल्याने शेतकऱ्यांच्या हरितक्रांतीचे स्वप्न पूर्ण होणार आहे.- सुनील ऊरकुडे, कृषी व पशुसंवर्धन सभापती,

टॅग्स :agricultureशेतीIrrigation Projectsपाटबंधारे प्रकल्प