ॲड. चंद्रक्रांत निमजे यांचा डोंगेघाटावर बुडून मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2021 04:28 IST2021-03-31T04:28:32+5:302021-03-31T04:28:32+5:30
ब्रह्मपुरी : ब्रह्मपुरी शहरातील नामांकित वकील चंद्रकांत निमजे (४३) यांचा शहराला लागून असलेल्या प्रसिद्ध अशा डोंगेघाटावर खोल पाण्यात बुडून ...

ॲड. चंद्रक्रांत निमजे यांचा डोंगेघाटावर बुडून मृत्यू
ब्रह्मपुरी : ब्रह्मपुरी शहरातील नामांकित वकील चंद्रकांत निमजे (४३) यांचा शहराला लागून असलेल्या प्रसिद्ध अशा डोंगेघाटावर खोल पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी दुपारी उघडकीस आली.
प्राप्त माहितीनुसार, ॲड. निमजे सकाळी घरून निघाले. फिरत फिरत ब्रह्मपुरीपासून दोन किलोमीटर अंतरावरील डोंगेघाट येथे पोहचले. आंघोळीची इच्छा झाल्याने पाण्यामध्ये उतरले. परंतु पोहता येत नव्हते. त्यांना खोल पाण्याचा अंदाज न आल्याने त्यांचा बुडून मृत्यू झाला.
सायंकाळी सुमारास नियमित पोहायला येणारे नागरिक डोंगे घाटावर पोहण्यासाठी आले असता त्यांना ॲड. निमजे यांचा मृतदेह पाण्यावर तरंगताना दिसला. या घटनेची माहिती होताच ब्रह्मपुरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह बाहेर काढून पंचनामा केला. ॲड. निमजे यांच्या अचानक झालेल्या मृत्यूने हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली असा आप्तपरिवार आहे. पुढील तपास ब्रह्मपुरी पोलिस करीत आहेत.