ॲड. साळवे यांच्या आठवणींना उजाळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2021 04:27 IST2021-03-31T04:27:56+5:302021-03-31T04:27:56+5:30
मराठा सेवा संघाच्यावतीने आदरांजली कार्यक्रम चंद्रपूर : माजी आमदार, ॲड. एकनाथराव साळवे यांचे नुकतेच निधन झाले. यानिमित्त मराठा ...

ॲड. साळवे यांच्या आठवणींना उजाळा
मराठा सेवा संघाच्यावतीने आदरांजली कार्यक्रम
चंद्रपूर : माजी आमदार, ॲड. एकनाथराव साळवे यांचे नुकतेच निधन झाले. यानिमित्त मराठा सेवा संघाच्यावतीने आदरांजली कार्यक्रमाचे मराठा सेवा संघाच्या सभागृहात आयोजन करण्यात आले होते. यावेळी विविध सामाजिक, राजकीय, शाळा तसेच सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती होती.
यावेळी माजी आमदार ॲड. एकनाथराव साळवे यांच्या कार्याचा गौरवग्रंथ प्रकाशित करण्याचा मानस व्यक्त करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते किशोर पोतनवार, प्रमुख पाहुणे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते हिराचंद बोरकुटे, ज्येष्ठ साहित्यिक इसादास भडके, सत्यशोधक समाजाचे अध्यक्ष माधवराव गुरुनुले, ओबीसी विचारवंत ॲड. अंजली साळवे-विटनकर नागपूर, चंद्रपूर येथील विधितज्ञ ॲड. जयंतराव साळवे, मराठा सेवा संघ जिल्हा चंद्रपूरचे अध्यक्ष दीपक खामनकर आदींची यावेळी उपस्थिती होती. प्रास्ताविक प्रा. दिलीप चौधरी, सूत्रसंचालन प्रशांत गोखरे यांनी तर आभार वीर भगतसिंग विद्यार्थी परिषद चंद्रपूरचे जिल्हाध्यक्ष अंकुश गोहने यांनी मानले. यावेळी मोठ्या संख्येने नागरिकांची उपस्थिती होती.