बल्लारपुरात २६ ला आदिवासींची धरणे
By Admin | Updated: February 25, 2016 00:57 IST2016-02-25T00:57:02+5:302016-02-25T00:57:02+5:30
आदिवासी बांधवांच्या सरकारकडे काही मागण्या असून, त्याबाबत विविध स्तरावर निवेदने देण्यात आलीत.

बल्लारपुरात २६ ला आदिवासींची धरणे
बल्लारपूर : आदिवासी बांधवांच्या सरकारकडे काही मागण्या असून, त्याबाबत विविध स्तरावर निवेदने देण्यात आलीत. मात्र, त्याकडे संबंधित विभागाने दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे, आदिवासी बांधवांनी या मागण्यांसाठी धरणे आंदोलन करण्याचे ठरविले आहे.
२६ फेब्रुवारीला हे धरणे आदोलन स्थानिक नगर परिषद चौकात दुपारी ११ ते ५ पर्यंत चालणार आहे. आदिवासींच्या मागण्या अशा बल्लारपूर येथील बिरसा मुंडा स्मृतीस्थळाची जागा संस्थेला मिळावी, खांडक्या बल्लारशाह यांच्या समाधी स्थळाची नोंद पुरातत्व विभागाने करावी. तद्वतच बल्लारपूर येथील सांस्कृतिक भवनाला आणि बल्लारशाह रेल्वे स्टेशनला राजे खांडक्या बल्लारशाह असे नाव द्यावे, रमाई घरकुलसारखी आदिवासींच्या विकासार्थ योजना असावी, सुभाष टाकीज जवळील चौकाला क्रांतीवीर नारायण सिंह उईके हे नाव द्यावे. या मागण्यांची माहिती देताना नारायणसिह उईके संघर्ष समितीचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. विनायक तुमराम यांनी आदिवासी धर्म स्थापन करीत असल्याचे सांगून त्याची रुपरेषा मांडली. त्याकरिता गडचिरोली येथे नोव्हेंबर महिन्यात सोहळा आयोजित केला असल्याचे त्यांनी सांगितले. या पत्रकार परिषदेत मीनाक्षी गेडाम, सुनील कुमरे, संतोष आत्राम, सत्यभामा आत्राम, लीना कुसराम, ज्योती पेंदोर, दामोदर नेवारे, सुनिल कोवे, कुसूम गेडाम, उमा नैताम, योगेश मडावी आदी उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)