लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर :महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एसटी) चालक. वाहकांसाठी गणवेश, नेमप्लेट व बेंज-बिल्ला बंधनकारक केला आहे. मात्र, याकडे अनेकदा दुर्लक्ष केले जाते. त्यामुळे चालक आणि वाहक कोण, हे कळणे प्रवाशांनाही कठीण जाते; परंतु तपासणीदरम्यान कर्मचारी आढळले, तर त्यांच्यावर दंडाची कारवाई करण्यात येते.
वाहक-चालकांनी कर्तव्यावर असताना मोटार वाहन कायद्यातील तरतुदीनुसार गणवेश धारण करूनच कामगिरी करणे आवश्यक आहे; परंतु काही कर्मचारी कामगिरीवर असताना मोटारवाहन कायद्यातील तरतुदीप्रमाणे विहित गणवेश परिधान करत नाही. २६६ वाहक, ३४३ चालकचंद्रपूर जिल्ह्यात चार आगार असून त्यात ३४३ चालक, १५३ चालक कम वाहक आणि १५० वाहक कार्यरत आहे. काही कंत्राटी कर्मचारीसुद्धा नेमले आहेत.
'लोकमत'ने काय पाहिले?चंद्रपूर एसटी आगारात पाहणी केली असता. येथे ये-जा करणाऱ्या चालक, वाहकाच्या अंगावर गणवेश दिसून आला, तसेच काहींचा बिल्ला, नेमप्लेटही दिसत होते; परंतु काहींनी त्याचे पालन केले नसल्याचे पाहणीत दिसून आले आहे.
आगार व्यवस्थापकांना सूचनाप्रत्येक वाहक आणि चालकांनी स्वच्छ गणवेश परिधान केलेला असावा. त्यांच्या गणवेशावर बिल्ला, नेमप्लेट, बेंज असावा, जेणेकरून प्रवाशांनाही त्याची माहिती होऊन एखाद्या वेळेस चालक किया वाहकाकडून गैरवर्तन झाल्यास त्यांना तक्रार करणे सोईचे ठरेल, त्या अनुषंगाने आगार व्यवस्थापकांना सूचना देण्यात आल्या आहे.
बिल्ला, गणवेश, नेमप्लेटचा वापर होतो का?प्रत्येक एसटीच्या वाहक आणि चालकाच्या अंगावर गणवेश, बिल्ला, नेमप्लेट असावे, असा नियम आहे. त्यानुसार बहुसंख्य आगारांतून चालक, वाहक याचे पालन केल्याचे दिसते.
"कर्मचाऱ्यांना कर्तव्यावर संपूर्ण गणवेश घालूनच येण्याच्या सूचना दिल्या आहेत. कर्मचारी सूचनेचे प्रमाणिकपणे पालन करत असून अपवादात्मक स्थिती वगळता नियमित गणवेशावरच कर्तव्यावर येतात. जे कर्मचारी सातत्याने गणवेश घालत नाही त्यांच्यावर कारवाई केली जाते."- पुरुषोत्तम व्यवहारे, विभागीय वाहतूक अधिकारी, चंद्रपूर