युरिया जास्त भावाने विकल्यास कारवाई
By Admin | Updated: September 16, 2014 23:38 IST2014-09-16T23:38:03+5:302014-09-16T23:38:03+5:30
जिल्ह्यात चालु महिन्यामध्ये ५ हजार १०० मेट्रिक टन युरीया खतासाठी शासनाकडे मागणी केली आहे. यातील २६ हजार मेट्रिक टन जिल्ह्यात उपलब्ध झाले आहे. उर्वरित खत येत्या तीन ते चार दिवसामध्ये

युरिया जास्त भावाने विकल्यास कारवाई
चंद्रपूर: जिल्ह्यात चालु महिन्यामध्ये ५ हजार १०० मेट्रिक टन युरीया खतासाठी शासनाकडे मागणी केली आहे. यातील २६ हजार मेट्रिक टन जिल्ह्यात उपलब्ध झाले आहे. उर्वरित खत येत्या तीन ते चार दिवसामध्ये उपलब्ध होणार आहे. तालुकानिहाय खताचा पुरवठा करण्यात आला आहे. त्यामुळे यावेळी युरिया खताची टंचाई जिल्ह्यात नसून शेतकऱ्यांनी आवश्यक मात्रेतच पिकांना युरिया खत द्यावे. नत्रयुक्त खताच्या अतिवापरामुळे पिकांवर परिणाम पडतो. त्यामुळे मर्यादित खत वापरून पिकांची निगा राखावी, असा सल्ला कृषी विभागाने शेतकऱ्यांना दिला आहे. जिल्ह्यातील काही कृषी केंद्र संचालक खताची कृतिम टंचाई दाखवून शेतकऱ्यांची लूट करीत असेल तर, अशा केंद्र संचालकांची शेतकऱ्यांनी तक्रार करावी, शेतकऱ्यांनी कोणत्याही परिस्थितीत जास्त पैसे देवून खत खरेदी करू नये, असेही कृषी विभागाने म्हटले आहे.
जिल्ह्यातील सावली, गोंडपिपरी, मूल, ब्रह्मपुरी, गोंडपिपरी आदी तालुके धानासाठी प्रसिद्ध आहे. तर, राजुरा, कोरपना, वरोरा, भद्रावती या तालुक्यांमध्ये कापूस तसेच इतर पिके घेतल्या जाते.
यावर्षी उशिरा आलेल्या पावसामुळे पिकांची उंची प्रमाणापेक्षा कमी आहे. त्यामुळे बहुतांश शेतकरी खताची मात्र वाढवून देत आहे. अशावेळी कृषी केंद्र संचालक शेतकऱ्यांना खताची टंचाई असल्याचे भासवून जास्त भावाने युरिता खत विकतात. यात शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होते. त्यामुळे शेतकऱ्यांनी सर्तक राहणे गरजेचे आहे. सोबतच अतिमात्रेत खतही पिकांने देणे धोकादायक ठरू शकते.
चालू महिन्यांमध्ये कृषी विभागाने ५ हजार १०० मेट्रीक टन युरिया खताची आयुक्तालयाकडे नोंदणी केली आहे. यातील २६ हजार मेट्रीक टन खत जिल्ह्यात पोहचले आहे. या खताचे वितरणही तालुकानिहाय करण्यात आले आहे. काही तालुक्यात रॅक उपलब्ध नसल्याने या तालुक्यांमध्ये खत पुरवठा करण्यासाठी काही कालावधी लागतो. हिच संधी बघत कृषी संचालक शेतकऱ्यांची लूट करतात. (नगर प्रतिनिधी)