नियम न पाळणाऱ्या ५६ आस्थापनांवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2021 04:24 IST2021-03-07T04:24:39+5:302021-03-07T04:24:39+5:30

वरोरा : कोविडच्या नियमांचे पालन न करणाऱ्या एकूण ५६ आस्थापना व दुकानांवर कारवाई करण्यात आली. त्यांच्याकडून एका दिवसात एकूण ...

Action against 56 non-compliant establishments | नियम न पाळणाऱ्या ५६ आस्थापनांवर कारवाई

नियम न पाळणाऱ्या ५६ आस्थापनांवर कारवाई

वरोरा : कोविडच्या नियमांचे पालन न करणाऱ्या एकूण ५६ आस्थापना व दुकानांवर कारवाई करण्यात आली. त्यांच्याकडून एका दिवसात एकूण एक लाख १० हजार रुपये दंड वसूल करण्यात आला.

तसेच एक पेट्रोलपंप व दोन मंगल कार्यालये यांच्यावरदेखील कारवाई करीत १२ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला. या कारवाईचा मुख्य उद्देश हा दंड वसूल करणे नसून नागरिकांमध्ये नियम पालनाबाबत गांभीर्य निर्माण करणे हा आहे. सर्व नागरिकांनी या नियमांचे कटाक्षाने पालन करून स्वतःचे व स्वतःच्या कुटुंबाचे रक्षण करावे, असे आवाहन तालुका प्रशासन वरोराकडून याद्वारे केले जात आहे.

कारवाईचे पूर्ण नियोजन व अंमलबजावणी तहसीलदार बेडसे पाटील यांच्या मार्गदशनाखाली नायब तहसीलदार मधुकर काळे व सलामे यांनी केले.

सर्व मंडल अधिकारी पथकप्रमुख म्हणून कार्यरत होते. पथकामध्ये नगरपालिका कर्मचारी व पोलीस कर्मचारी यांचा समावेश होता.

Web Title: Action against 56 non-compliant establishments

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.