आरोपींना ठाण्यातील स्वागतकक्षात पाहुणचार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2018 22:22 IST2018-11-04T22:22:32+5:302018-11-04T22:22:57+5:30
येथील मालविय वॉर्डातील रुक्मिणी रेस्टॉरंटमध्ये पोलिसांनी शनिवारी रात्री १० वाजताच्या सुमारास धाड टाकली. रेस्टॉरंटची झडती घेतली असता त्यांना विदेशी दारूसाठा आढळून आला.

आरोपींना ठाण्यातील स्वागतकक्षात पाहुणचार
लोकमत न्यूज नेटवर्क
वरोरा : येथील मालविय वॉर्डातील रुक्मिणी रेस्टॉरंटमध्ये पोलिसांनी शनिवारी रात्री १० वाजताच्या सुमारास धाड टाकली. रेस्टॉरंटची झडती घेतली असता त्यांना विदेशी दारूसाठा आढळून आला. रेस्टॉरंटच्या नावावर दारू विक्री करणाऱ्या रुक्मिणी रेस्टॉरंटचे मालक माजी नगरसेवक विक्रम उर्फ विलास कन्नमवार यांच्यासह तीन जणांना रात्रीच अटक केली. मात्र त्यानंतर त्यांना पोलीस ठाण्यातील स्वागतकक्षात पाऊणचार खाऊ घातला. एका अवैध दारू विक्रेत्याला पोलीस ठाण्यात अशी व्हीआयपी वागणूक देणाºया वरोरा ठाणेदाराविषयी संतापजनक प्रतिक्रिया उमटत आहे.
ठाणेदार उमेश पाटील यांना रुक्मिणी रेस्टॉरंटमध्ये दारू विकली जात असल्याची माहिती मिळाली. माहिती मिळताच शनिवारी रात्री ते एकटेच घटनास्थळी पोहोचले. रेस्टॉरंटचे मालक घटनास्थळी दारू विकत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आल्याने पोलीस निरीक्षकांनी त्वरित आपल्या कर्मचाºयांना बोलावून दुकानाची झडती घेतली. यादरम्यान विदेशी दारूच्या अकरा बॉटल हस्तगत करण्यात आल्या. सोबतच दारू गुत्ता नियमानुसार ३५ हजारांचा मुद्देमाल त्यामध्ये टेबल-खुर्ची दारूचे रिकामे ग्लास इत्यादी साहित्य जप्त करण्यात आले. घटनास्थळी काऊंटरवर बसलेले मालक माजी नगरसेवक विक्रम कन्नमवार (४२) रा.अंबादेवी वार्ड वरोरा यांच्यासह रेस्टॉरंटचे व्यवस्थापक योगेश ज्ञानेश्वर पचारे (३०), रवींद्र किशोर धाडसे (१८), भास्कर मोतीराम कोटेवार (५२) यांना अटक करण्यात आली. त्यानंतर या अटकेतील आरोपींना इतर दारू विक्रेत्यांसारखी वागणूक न देता व्हीआयपी वागणूक देण्यात आली. आरोपींची वैद्यकीय चाचणी झाल्यानंतर त्यांना पोलिस स्टेशनमधील स्वागतकक्षात पाऊणचार खाऊ घालण्यात आला. एकीकडे माजी नगरसेवक शरद मडावी यांचे चिरंजीव अटकेत असताना त्यांना घरून आणलेला डबा नाकारण्यात येतो तर दुसरीकडे माजी नगरसेवक विक्रम कन्नमवार यांना स्वागतकक्षात दिवाळीचा पाहुणचार दिला जातो. दारू प्रकरणातील दोन वेगवेगळ्या वागणुकीमुळे पोलीस कार्यप्रणालीवर शंका व्यक्त केली जात आहे. त्यामुळे या सर्व घटनेमध्ये वरिष्ठांनी लक्ष देण्याची आवश्यकता व्यक्त करण्यात येत आहे.