लग्न समारंभातील गोंधळावरुन आरोप-प्रत्यारोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2017 00:20 IST2017-05-26T00:20:43+5:302017-05-26T00:20:43+5:30

येथे एका लग्न समारंभात वाढणाऱ्या मुलांना मारहाण झाली. या प्रकरणी पोलिसांनी थातुरमातूर चौकशी केल्याचा आरोप

Accusations and conflicts on conflicts in wedding ceremonies | लग्न समारंभातील गोंधळावरुन आरोप-प्रत्यारोप

लग्न समारंभातील गोंधळावरुन आरोप-प्रत्यारोप

पोलीस अधीक्षकांकडे तक्रार
लोकमत न्यूज नेटवर्क
भिसी: येथे एका लग्न समारंभात वाढणाऱ्या मुलांना मारहाण झाली. या प्रकरणी पोलिसांनी थातुरमातूर चौकशी केल्याचा आरोप करुन सदर मुलांनी थेट पोलीस अधीक्षकांकडे तक्रार केली. भिसी पोलीस तक्रारच आली नसल्याने सांगून दोन दिवसानंतर तक्रारीचे कारण समजण्यापलीकडे असल्याचे सांगत असल्यामुळे या प्रकरणाचे गुढ वाढले आहे.
आशिष गेडाम यांच्या लग्न समारंभात संत गजानन महाराज भोजन वाढणे मंडळाची मुले भोजन वाढत होती. मनोज गेडाम व त्याच्या तीन सहकाऱ्यांनी त्या मुलांशी हुज्जत घालून त्यांना मारहाण केली. दरम्यान, बाबा गेडाम याने एका मुलाच्या हाताला चावा घेतल्याने एकच गोंधळ निर्माण झाला, असा आरोप तक्रारीत सदर मुलांनी पोलीस अधीक्षकांकडे केलेल्या तक्रारीत केला आहे. घटनास्थळी लगेच पोलीस ताफा पोहचल्याने प्रकरण निवळले.
घटनेच्या दुसऱ्या दिवशी भोजन वाढणे करणाऱ्या मुलांनी पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली असता थातुर मातुर चौकशी करुन प्रकरण शांत करण्याचा प्रयत्न केला. ज्या मुलाच्या हाताचा चावा घेतला त्याची वैद्यकीय तपासणीसुद्धा पोलिसांनी केली नाही. याप्रकरणी भोजन वाढणाऱ्या मुलांनी याची तक्रार थेट पोलीस अधीक्षक यांच्याकडे पाठविली. सदर तक्रारीत, पोलीस ठाण्यात गेल्यानंतर मनीष गेडाम नामक हवालदाराने या मुलांना थांबवून जातिवाचक शिवीगाळ व जिवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोपही केला आहे. याबाबत हवालदार गेडाम यांच्याशी भ्रमणध्वनीवरुन संपर्क साधला असता ते म्हणाले, काही कारण नसताना आरोप करीत आहे. याचा कर्ताकरविता वेगळाच आहे. ठाण्याच्या प्रवेशद्वारासमोर सीसीटीव्ही कॅमेरा असल्यामुळे सत्य समोर यईलच. ठाणेदार तामटे म्हणाले, मुलींनी मनीष गेडामची तक्रार अगोदर माझ्याकडे करायला हवी होती. दोन दिवसांनी त्यांच्या मनात आलेला तक्रारीचा विचार वेगळेच काही सांगतो. तक्रारकर्ता अक्षय सहारे हा वाढण मंडळाचा अध्यक्ष असून मंडळातील मुले दहावी, अकरावी, बारावी व पुढील शिक्षण घेणारे आहे हे विशेष.

Web Title: Accusations and conflicts on conflicts in wedding ceremonies

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.