शहरं
Join us  
Trending Stories
1
ISI नं का घडवला मुंबईवर हल्ला?; पाकिस्तानी राष्ट्रपती जरदारीच्या प्रवक्त्याचा मोठा दावा
2
"...तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावर येणार नाही"; कर्जमाफी घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला
3
मारुतीने आज जो इतिहास घडवला, टाटालाही झेपणार नाही; ४२ वर्षांत ३ कोटी कार विकल्या...
4
फक्त २९ पैशांचा शेअर थेट १०० रुपयांवर! १ लाखाच्या गुंतवणुकीतून झाला '३.४४ कोटींचा' नफा
5
जगातील अवघ्या ३ लोकांकडे आहे 'ही' कार! डिझाईन पाहून प्रेमात पडाल अन् किंमत ऐकून हैराण व्हाल!
6
१७ वर्षे एकाच कंपनीत काम केले, अचानक काढून टाकले, कर्मचाऱ्याने लाखमोलाचा दिला सल्ला, पोस्ट व्हायरल
7
मोदी सरकारचा मोठा निर्णय; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिल्यांदाच पाकिस्तानात गेले 2100 भारतीय, कारण काय?
8
भाजी विक्रेत्याने जिंकली तब्बल ११ कोटींची लॉटरी; टॅक्स भरून हातात किती पैसे येणार?
9
चेज मास्टर विराट कोहलीचे व्यवसायिक साम्राज्य माहितीये का? क्रिकेटपेक्षा इथून करतो सर्वाधिक कमाई
10
Student Death: स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या सागरने आईच्या साडीनेच संपवले आयुष्य; एका तरुणीमुळे...
11
गुगल क्रोम वापरणाऱ्यांना मोठा धोका; हॅकर्सचं लक्ष तुमच्यावरच! सुरक्षित राहण्यासाठी 'ही' गोष्ट आताच करा
12
Shocking: गंमत म्हणून विवाहित महिलेनं डीएनए चाचणी केली, सासराच निघाला बाप!
13
देव तारी त्याला कोण मारी! भीषण रेल्वे अपघातात ढिगाऱ्याजवळ जिवंत सापडला चिमुकला, पण...
14
भाजपाची महिला पदाधिकारी, नेत्यांना पुरवायची मुली; बिहार निवडणुकीत वरिष्ठांनी दिली जबाबदारी
15
श्रीदेवीचा सुपरहिट सिनेमा 'मॉम'च्या सीक्वेलमध्ये दिसणार 'ही' अभिनेत्री, सेटवरील फोटो लीक
16
लाडकी बहीण अन् काय काय...! वर्षात १२ राज्यांनी महिलांना वाटले तब्बल १.६८ लाख कोटी रुपये
17
तो, ती आणि प्रेमाची बहार! पांड्यानं शेअर केला गर्लफ्रेंडसोबतचा खास व्हिडिओ
18
क्या बात! रितेश देशमुखच्या आईसाहेबांनी बल्बच्या प्रकाशात घेतलं ड्रॅगन फ्रूटचं पीक; सूनबाईंना कौतुक, शेअर केला व्हिडीओ
19
सोनाराच्या दुकानात ४ वर्ष काम केलं, रोज थोडं थोडं करून २.५ कोटींचं सोनं गायब केलं! कशी पकडली गेली चोरी?
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

काय सांगता; आता शुभमंगल सावधान, २५ जूननंतरच...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2024 16:02 IST

२३ वर्षांनंतर ही परिस्थिती: यंदा विवाहाचे मुहूर्त गेल्या वर्षीपेक्षा कमी

लोकमत न्यूज नेटवर्क चंद्रपूर : यावर्षी मे आणि जून महिन्यात विवाह मुहूर्त नसल्याने अनेकांनी एप्रिलमध्येच लग्नाचा बार उडवून टाकला. ३ मे ते २५ जूनपर्यंत एकही विवाह मुहूर्त नसल्यामुळे नुकतेच लग्न जुळलेल्या वधू-वरांना मुहूर्तासाठी प्रतीक्षा करावी लागणार आहे. लग्नकार्य नसल्यामुळे सर्वच क्षेत्रांतील व्यावसायिकांमध्ये नाराजीचा सूर आहे.

मे आणि जून महिन्यांत लग्नकार्य नसल्यामुळे बँडवाल्यांपासून ते मंडप डेकोरेशन, मंगल कार्यालय, लॉन, आचारी, केटरर्स, पुरोहित, छायाचित्रकारांपर्यंत आदी लग्नकार्यावर अवलंबून असणाऱ्या व्यावसायिकांना आर्थिक झळ बसणार आहे. मे आणि जून महिन्यांत लग्न तारखा नसल्यामुळे या दिवसांत काय करावे, असा प्रश्न त्यांना पडला आहे. यावर्षी विवाहाचे योग गेल्या वर्षीपेक्षा कमी आहेत. दरवर्षी मे आणि जून महिन्यांत विवाह सोहळे मोठ्या प्रमाणात पार पडतात. यंदा मात्र मे जूनमध्ये गुरू आणि शुक्र या दोन्ही ग्रहांचा एकत्रित अस्त असल्याने या काळात मंगलकार्य करू नये, असे शास्त्र सांगते. दोघांचा एकत्रित अस्त असल्याने आता २५ जूननंतर मुहूर्त आहेत. अशी परिस्थिती २३ वर्षानंतर पहिल्यांदा आली आहे.

वेळ आणि सोयीनुसार लग्नबहुतांश कुटुंब लग्न तसेच अन्य शुभकार्य मुहूर्त बघूनच करतात. मात्र काही कुटुंबे यावर विश्वास ठेवत नाही. आपल्या सोयीनुसार आणि वेळेनुसार लग्नकार्य उरकून घेतात. त्यामुळे मुहूर्त नसले तरी काही कुटुंबात लग्नकार्य पार पाडले जात आहे. मात्र मुहूर्त न बघता लग्नकार्य करणाऱ्यांची संख्या आजही बरीच कमी आहे.

एप्रिल ते डिसेंबरपर्यंत ६५ मुहूर्त■ यंदा विवाहासाठी एप्रिलपासून डिसेंबरपर्यंत ६५ मुहूर्त आहेत. काही कुटुंबे मुहूर्त न बघ बघताच लग्नकार्य आटोपण्याच्या मनःस्थितीत आहेत.■ मे, जून महिन्यामध्ये फारसे मुहूर्त नसल्याने ग्रामीण भागातील अनेक कुटुंबांनी मुलांचे लग्न एप्रिल- मध्येच आटोपून घेतले. मात्र जे कुटुंब मुहूर्त बघूनच लग्न करतात आणि नुकतेच लग्न जुळले आहे, अशा कुटुंबीयांना मुहूर्तासाठी प्रतीक्षा करावी लागणार आहे.■ मे महिन्यात अवघे दोन दिवस मुहूर्ताचे होते. २५ जूननंतर लग्नाचे मुहूर्त आहेत. 

टॅग्स :marriageलग्नMaharashtraमहाराष्ट्रchandrapur-acचंद्रपूर