निवास व्यवस्थाही योग्य नाही
By Admin | Updated: July 22, 2014 23:56 IST2014-07-22T23:56:38+5:302014-07-22T23:56:38+5:30
जवाहर नवोदय विद्यालयातील पालकांचा असंतोष लक्षात घेऊन समजूत काढण्यासाठी प्रशासन प्रयत्न करीत आहेत. प्रशासनाने काही पालकांसमवेत भेट घेण्याचा प्रयत्न सुरू केला. उपप्राचार्यांकडून तक्रारीची

निवास व्यवस्थाही योग्य नाही
परिसरात झुडपांचा कहर : प्रशासनाची बनवाबनवी
हरिश्चंद्र पाल - तळोधी(बा.)
जवाहर नवोदय विद्यालयातील पालकांचा असंतोष लक्षात घेऊन समजूत काढण्यासाठी प्रशासन प्रयत्न करीत आहेत. प्रशासनाने काही पालकांसमवेत भेट घेण्याचा प्रयत्न सुरू केला. उपप्राचार्यांकडून तक्रारीची शहानिशा करण्याचा प्रयत्न केला असता. उपप्राचार्य खंडाळे हे गोड बोलनू पालकांची समजूत काढत आहे.
उपप्राचार्यांच्या म्हणण्यानुसार विद्यार्थ्यांना दररोज दुपारी १.४० वाजता जेवण दिले जाते. परंतु रविवारला ३ वाजता जेवण दिले गेले. विद्यार्थ्यांच्या जेवणात वापरण्यात येणारे गूह हे निकृष्ट दर्जाचे असून जेवणात वाढण्यात आलेली पोळी कच्ची व दर्जेदार नसल्याचे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे. विद्यार्थ्यांसाठी जेवनात वापरण्यात येणारे गहू व तांदळाची खरेदी खुल्या बाजारातून न करता सरकारी गोदामातून करण्यात आली. गहू सहा रुपये प्रमाणे खरेदी केल्याचे सांगत असले तरी गव्हाचा व तांदळाचा दर्जा नाही. मागील तीन वर्षांपासून जिल्हाधिकारी किंवा त्यांच्या प्रतिनिधींनी विद्यालयाला भेट दिली नाही. तीन वर्षापूर्वी जिल्हाधिकारी विजय वाघमारे यांनी पीटीसी सदस्यासोबत चर्चा केल्याची माहितीप्राप्त झाली आहे.
विद्यार्थ्यांना दरवर्षी केवळ १७२ पेजेसचे सहा नोटबुक दिले जाते. त्यामुळे विद्यार्थ्यांना बाजारातून वह्या व नोटबुक तसेच प्रकल्प साहित्य खरेदी करावे लागते. वाढीव दरानुसार प्रत्येक विद्यार्थ्यामागे याकरिता ४०० रुपये देय असताना हा खर्च प्रत्यक्षात होत नाही. विद्यार्थ्यांना देण्यात येणारी फळफळावळे, बिस्कीट मागील सहा महिन्यांपासून विद्यार्थ्यांना देण्यात आली नाही. पीटीसी सदस्यांच्या म्हणण्यानुसार मागील वर्षापासून पीटीसी सभा झालीच नाही. प्रशासन सभा घेण्यासाठी टाळाटाळ करीत आहे.
रविवारी विद्यार्थ्यांना १० वाजेपर्यंत आंघोळीकरिता पाणी उपलब्ध झाले नव्हते. मुलीकडील वस्तीगृहातील आरो बंद असून पिण्याचे पाणी टाकीत भरलेच गेले नव्हते. त्यामुळे विद्यार्थिंनींना आरोचे शुद्ध पाण्याऐवजी अशुद्ध व क्षारयुक्त पाणी प्यावे लागत आहे. शाळेत सत्र १ जुलैला सुरु झाले असूनही विद्यार्थिंनीच्या वस्तीगृहात वार्डनची व्यवस्था करण्यात आली नाही. मागील वर्षात कामावर असलेली वार्डन तीन वर्ष झाले म्हणून कामावरुन काढण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. विद्यार्थिंनींना ज्या पाण्याच्या टाकीतून पाणी पुरविण्यात येते त्या टाकीत घाण वास येतो. त्यानुसार पालकासमवेत प्रतिनिधींनी पाहणी करण्याची मागणी उपप्राचार्याकडे केली असता विद्यार्थिंनींच्या वसतीगृहात घोरपड घुसल्याचे सांगून उपप्राचार्यानी वेळ मारून नेली. मुलामुलींच्या वस्तीगृहाच्या सभोवताल असलेल्या झुडपांमुळे व झाडांमुळे वसतिगृहात साप व इतरही सरपटणाऱ्या प्राण्यांचा मुक्त संचार आहे. विद्यालयातील वस्तीगृहाचा काही भाग विद्यार्थ्यांना राहण्यायोग्य नसला तरी तिथे मुलीना जबरदस्तीने निवास व्यवस्था केली आहे. एकंदरीत पालकांनी केलेल्या तक्रारीत बरीच सत्यता असून शालेय व्यवस्थापक मंडळी मात्र गोड बोलनू पालकांच्या अशिक्षित व गरीबीचा फायदा घेत आहे.