शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

‘चाॅकलेट डे’ साजरा करून परतताना अपघात; तरुण-तरुणी ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2023 22:29 IST

Chandrapur News सिंदेवाही ते मूल मार्गावरील सरडपार येथील पुलाजवळ दुचाकीला एका अज्ञात चारचाकी वाहनाने जोरदार धडक दिली. या अपघातात दुचाकीवरील एक तरुण व तरुणी जागीच ठार झाले तर दुचाकीवरील तिसरा तरुण गंभीर जखमी झाला.

ठळक मुद्देसिंदेवाही तालुक्यात अपघात, एक तरुण गंभीर

चंद्रपूर : सिंदेवाही ते मूल मार्गावरील सरडपार येथील पुलाजवळ दुचाकीला एका अज्ञात चारचाकी वाहनाने जोरदार धडक दिली. या अपघातात दुचाकीवरील एक तरुण व तरुणी जागीच ठार झाले तर दुचाकीवरील तिसरा तरुण गंभीर जखमी झाला. त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते. हा अपघात गुरुवारी रात्री ९ वाजताच्या सुमारास घडला. घटनेनंतर लगेच जखमी व मृतकांना सिंदेवाही येथील ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले. घरी खोटे सांगून चाॅकलेट डे साजरा करण्याकरिता हे तिघेही जण सिंदेवाहीला गेले होते. तेथून परताना हा अपघात झाल्याची गावात चर्चा आहे.

सेजल अनिल कुंभारे (१९) रा. राजोली ता. मूल व सुमित राजू अलोणे (२३) रा. डोंगरगाव ता. सिंदेवाही अशी मृतकांची नावे आहे. तर अक्षय यादव लेनगुरे (२३) हा गंभीर जखमी झाला आहे. या घटनेने राजोली व डोंगरगाव गावावर शोककळा पसरली आहे. सध्या व्हॅलेंटाइन वीक सुरू असून गुरुवारी चाॅकलेट डे होता. यानिमित्ताने ते तिघेही घरी खोटे सांगून दुपारी ४ वाजता घराबाहेर पडले. सेजल ही मूल येथे नर्सरीचे शिक्षण घेत आहे. तिने आपल्या कुटुंबीयांना आपण मूल येथे जात असल्याचे सांगितले, तर सुमित आणि अक्षय यांनी आपण चंद्रपूरला मुक्कामी जात असल्याचे सांगितल्याची गावात चर्चा आहे. मात्र हे तिघेही सिंदेवाही येथे चाॅकलेट साजरा करण्यासाठी गेले होते. चाॅकलेट डे साजरा करून रात्री ८.३० वाजताच्या सुमारास तिघेही जण सिंदेवाही येथून दुचाकीने आपापल्या गावाकडे परतत असताना अवघ्या ६ कि. मी. अंतरावरील सरडपारजवळ भरधाव अज्ञात वाहनाने त्यांना जोरदार धडक दिली. या अपघातात सेजल आणि सुमित गंभीर जखमी हाेऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला. घटनास्थळी रक्ताचा सडा पडलेला होता. घटना होताच त्या मार्गाने जाणाऱ्या लोकांसह व सरडपार येथील नागरिकांनी लगेच सिंदेवाही ग्रामीण रुग्णालयात येथे हलविले.

अक्षयची प्रकृती चिंताजनक असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. सिंदेवाही ग्रामीण रुग्णालयात नागरिकांची चांगलीच गर्दी झाली होती. अधिक तपास सिंदेवाही पोलिस करीत आहेत.

टॅग्स :Accidentअपघात