बल्लारशाह रेल्वे स्थानकावर पिटलाईनच्या कामाची गती वाढवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2021 04:18 IST2021-07-19T04:18:44+5:302021-07-19T04:18:44+5:30
फोटो : बल्लारपूर : येथील रेल्वे स्थानकावरील पिटलाईनची सुविधा त्वरित पूर्ण करावी, सोबतच ऑटो कोच क्लिनिंगची व्यवस्था, तिसऱ्या ...

बल्लारशाह रेल्वे स्थानकावर पिटलाईनच्या कामाची गती वाढवा
फोटो :
बल्लारपूर : येथील रेल्वे स्थानकावरील पिटलाईनची सुविधा त्वरित पूर्ण करावी, सोबतच ऑटो कोच क्लिनिंगची व्यवस्था, तिसऱ्या रेल्वे लाईनचे कार्य बल्लारशाहपासून बाबूपेठपर्यंत पूर्ण करावे, अशी मागणी झेडआरयूसीसी सदस्य श्रीनिवास सुंचूवार, डीआरयूसीसी सदस्य विकास राजुरकर यांनी केली आहे. यासंदर्भातील निवेदन माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर, विधिमंडळ लोकलेख समितीचे अध्यक्ष, आमदार सुधीर मुनगंटीवार व भाजपचे ज्येष्ठ नेते चंदनसिंह चंदेल, मध्य रेल्वेचे महाप्रबंधक, मंडल रेल्वे प्रबंधकांना दिले.
बल्लारशाह रेल्वे स्थानक मध्यभारतातील प्रमुख रेल्वे जंक्शन आहे. मध्य रेल्वे, दक्षिण मध्य रेल्वे, दक्षिण पूर्व मध्य रेल्वे या तीनही झोनशी जोडले आहे. त्यामुळे चंद्रपूर, गडचिरोली व तेलंगणाच्या सीमेवर असलेले रेल्वे प्रवासी या रेल्वे स्थानकावरून प्रवास करतात. प्रवाशांच्या सुविधेसाठी पिटलाईनचे कार्य सुरू आहे. पिटलाईनसाठी तत्कालीन केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी तत्कालीन रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांच्याकडून ११ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आणि ७ मार्च २०१९ ला भूमिपुजन झाले. पिटलाईनने काम मागील दोन वर्षांपासून सुरू आहे. मात्र, पाहिजे तशी गती नसल्याने ते काम वेळेत पूर्ण होणे अशक्य आहे. त्यामुळे ते काम त्वरित पूर्ण करून प्रवाशांना दिलासा द्यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.