शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
2
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
3
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
4
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
5
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
6
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
7
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
8
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
9
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
10
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
11
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
12
शिंदेंना चढावी लागणार ‘व्हाइट हाउस’ची पायरी; गणेश नाईक यांचा नवी मुंबईसह आगरी मतांवर प्रभाव
13
मराठी पाट्यांचे रडगाणे; ९८ टक्के आस्थापनांनी न्यायालयाच्या आदेशाचे पालन केले
14
दगडफेकीपर्यंतचा प्रचार कोणत्या दिशेने जाणार?
15
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
16
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी
17
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
18
“शरद पवारच माझे मुख्य प्रचारक, यशवंत चव्हाणांना भारतरत्न देण्याचे का सुचले नाही”: उदयनराजे
19
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...
20
"अडीच हजार फोन केले तेव्हा..., सगळे लफडे काढतो त्याचे"; चंद्रकांत खैरे संजय शिरसाटांवर एवढं का संतापले?

जिल्ह्यातील तब्बल १७२ गावे हत्तीरोगाच्या सावटात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2020 6:00 AM

या रोगाचा प्रसार क्यूलेक्स डासाच्या मादीपासून होतो. डासाची मादी हत्तीरोगग्रस्त रोग्यास चावते. ती आपल्या सोंडेने शरीरातील रोगगंतु ओढून घेते. या रोगजंतुची वाढ डासाच्या शरीरात १०-१४ दिवसात होते. वाढ पूर्ण झाल्यावर ती मादी निरोगी माणसाला चावते. डास चावल्यानंतर दुषित अळी डासाने छिद्र केलेल्या जागेतून निरोगी मनुष्याच्या शरीरात प्रवेश करते, त्यानंतर त्वचेखालून आपला मार्ग आक्रमित लसीयुक्त ग्रंथीत व कालांतराने पूर्णवस्थेत येवून रूपांतर जंतूमध्ये होते.

ठळक मुद्देआरोग्य विभागासमोर आव्हान । संबंधित गावात राबविणार विशेष मोहीम

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : डासांपासून प्रसार होणाऱ्या आजारपैकी हत्तीरोग (फायलेरिया) हा एक महत्त्वाचा रोग आहे. या रोगाचे वैशिष्ट्ये असे की, ज्या माणसाच्या हातापायांवर अथवा गुप्तांगांवर सुज येत नाही, तोपर्यंत या रोगाची अजिबात कल्पना येत नाही. या रोगाने शरीर विकृत दिसू लागते व हत्तीरोग होतो. जिल्ह्यातील १७२ गावांमध्ये हा आजार होण्याची शक्यता असल्याने आरोग्य विभागाने हत्तीरोगासाठी संवेदनशिल म्हणून जाहीर केली आहेत.या रोगाचा प्रसार क्यूलेक्स डासाच्या मादीपासून होतो. डासाची मादी हत्तीरोगग्रस्त रोग्यास चावते. ती आपल्या सोंडेने शरीरातील रोगगंतु ओढून घेते. या रोगजंतुची वाढ डासाच्या शरीरात १०-१४ दिवसात होते. वाढ पूर्ण झाल्यावर ती मादी निरोगी माणसाला चावते. डास चावल्यानंतर दुषित अळी डासाने छिद्र केलेल्या जागेतून निरोगी मनुष्याच्या शरीरात प्रवेश करते, त्यानंतर त्वचेखालून आपला मार्ग आक्रमित लसीयुक्त ग्रंथीत व कालांतराने पूर्णवस्थेत येवून रूपांतर जंतूमध्ये होते. मानवाचे शरीरात त्यांचे जीवनचक्र ६ ते ७ वर्षेही चालते. जंतुची वाढ रक्तात चालू असताना औषधोपचार केला तर ते नष्ट पावून मरतात व सुज येणे थांबते, अशी माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली. या आजाराला १०० टक्के प्रतिबंध घालण्यासाठी येत्या २ ते २० मार्च २०२० पर्यंत विशेष मोहीम सुरू केले जाणार आहे. या कालावधीत विशेष मोहिमेतर्गत मिळणाºया डीईसी व अलबेंडॉझोल या गोळ्यांची एक मात्रा जेवणानंतरच जरूर घ्यावी. या गोळ्यांचे सेवन केल्यानंतर ताप, डोकेदुखी, उलटी, जुलाब इत्यादी त्रास होण्याची शक्यता असते, त्यामुळे घाबरून न जाता डॉक्टरांचा सल्ला घ्या व कोणत्याही परिस्थितीत औषधोपचार थांबवू नका, असा सल्ला आरोग्य विभागाने दिला आहे.हत्तीरोग (लिम्फॅटिक फायलेरीयासिस) या डासांपासून मनुष्याला होणारा आजार आहे. या आजारामुळे रुग्णाचे पाय (अवयव), वृषण हे आकाराने जाड होतात व रुग्णाला हालचाल करणेही अवघड होवून बसते. मायक्रोफायलेरिया नावाचे कृमी, डासांच्या चाव्याद्वारे निरोगी व्यक्तीच्या शरीरात संक्रमित होतात. हा रोग झाल्यानंतर त्यावर कोणताही परिणामकारक उपाय नाही. ज्यांच्या रक्तामध्ये मायक्रोफायलेरिया असतात, त्यांना दूषित रुग्ण असे म्हटल्या जाते. असे व्यक्ती हत्ती रोगाचे संसर्गस्त्रोत असतात. एकदा हत्तीरोग पूर्ण विकसीत झाला की नंतर मात्र त्या रुग्णांच्या रक्तामध्ये जंतू सापडणे कठीण असते. आतापर्यंतच्या तपासणीत जिल्ह्यात ११ हजार ८०० हत्तीरोग रूग्ण आढळले. ही संख्या महाराष्ट्रात सर्वाधिक असल्याने आरोग्य प्रशासनाने मोहिमेची तयारी सुरू केली आहे.हत्तीरोगाची लक्षणेताप व कधी कधी थंडी वाजते.ताप ५ ते ९ दिवस राहतो.तीव्र स्नायू व सांधेदुधीचा त्रास होतो.रोगामुळे उग्र स्वरूपात वृषणाच्याआकारामध्ये वाढ होऊन हत्तीपाय होतो.हत्तीरोग प्रतिबंधासाठी मोहीम सुरू करण्याबाबत नियोजनाचे निर्देश दिले आहेत. २ ते २० मार्चपासून संबंधित यंत्रणा संवेदनशिल गावांमध्ये जाणार आहे.- जे.पी. लोंढे,अतिरिक्त जिल्हाधिकारी, चंद्रपूर.

टॅग्स :Healthआरोग्य