शहरं
Join us  
Trending Stories
1
धक्कादायक बातमी! बुधवार पेठेतून ५ बांगलादेशी महिलांना पकडले; देशात होते अवैध वास्तव्य
2
रत्नागिरी: आरेवारे येथे लाटांचा अंदाज न आल्याने समुद्रात बुडून तीन बहिणींसह चौघांचा मृत्यू
3
बाबा ताजुद्दीन उरूस: नागपूर रेल्वे स्थानकावर सुविधा, कडेकोड सुरक्षा; प्रशासन सज्ज
4
महापालिका उमेदवारीची सर्वाधिक स्पर्धा भाजपमध्ये; आताच ५०० पेक्षा अधिक इच्छुकांची यादी तयार
5
पडळकरांना सभागृहात एक दिवस न बोलण्याची शिक्षा दिल्याने त्यांच्यात सुधारणा - नीलम गोऱ्हे
6
"असले राजकीय स्टंट सहन करणार नाही, माफी मागा"; राज ठाकरेंच्या वक्तव्याने गुजरातमध्ये संताप
7
आधी 'जिथं तू तिथं मी...' आता एकमेकांना अनफॉलो करत हार्दिक-जास्मिन यांच्यातील प्रेमाचा खेळ संपला!
8
वहिनीच्या अवतीभवती फिरायचा दीर, 'त्या' दिवशी हाताला धरून तिला घरी आणलं अन् कहरच केला...
9
Porsche Cayenne: पोर्शे केयेन ब्लॅक एडिशन भारतात लॉन्च; किंमत सर्वसामन्यांच्या आवाक्याबाहेर!
10
'बिहारमध्ये वीजच नाही तर बिल कुठून येणार'; नितीश कुमारांच्या घोषणेची भाजप मंत्र्याने उडवली खिल्ली
11
IND vs ENG : बुमराह 'ऑन ड्यूटी'; सिराजला मिळणार सुट्टी! टीम इंडियात शिजतोय हा प्लॅन
12
'कोल्डप्ले' कॉन्सर्टमध्ये CEO आणि HRचं अफेअर झालं उघड, आता कंपनीने केली 'ही' कारवाई
13
Electric Scooter: ओला, टीव्हीएस, बजाजसाठी धोक्याची घंटा, बाजारात येतेय रेट्रो स्टाईल इलेक्ट्रीक स्कूटर!
14
सुंदरा मनामध्ये भरली... फ्रान्समध्ये दिसला सारा तेंडुलकरचा नवा लूक, चाहतेही झाले फिदा
15
विनयभंगाच्या गुन्ह्याखाली तरुंगात गेला; सुटून आल्यानंतर पीडिताच्या घरासमोरच फोडले फटाके!
16
"...मग नितेश राणे सरकारमध्ये बसून फक्त पंखा हलवणार का?"; मनसे नेत्याचा खोचक सवाल
17
Rohini Khadse : "अरे कुणाला मूर्ख बनवता? पोलीस सत्ताधाऱ्यांच्या इशाऱ्यावर नाचताहेत...”, रोहिणी खडसेंचा संताप
18
सुनेवर होती वाकडी नजर, सतत मुलाशी भांडण अन् एके दिवशी सासऱ्याने टोकच गाठलं...
19
Mallikarjun Kharge : "४२ देश फिरले, पण मणिपूरला एकदाही नाही गेले", मल्लिकार्जुन खरगेंचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल
20
'कुणबी प्रमाणपत्र,व्हॅलिडिटीचा प्रश्न सोडवा'; धाराशिवमध्ये सरनाईकांना मराठा तरुणांचा घेराव!

काँग्रेसच्या विजयासाठी मतभेदांना तिलांजली द्या

By admin | Updated: July 31, 2016 01:47 IST

काँग्रेसला स्वातंत्र्योपूर्व काळापासून चळवळीचा इतिहास आहे. जनमानसात काँग्रेसची विचारसरणी रुजली आहे.

गजानन गावंडे : बल्लारपुरात पार पडला कार्यकर्ता मेळावा बल्लारपूर : काँग्रेसला स्वातंत्र्योपूर्व काळापासून चळवळीचा इतिहास आहे. जनमानसात काँग्रेसची विचारसरणी रुजली आहे. केंद्र व राज्यातील विद्यमान सरकारने सत्तेवर आल्यावर जनतेची दिशाभूल केली आहे. त्यामुळे सर्वसामान्य मतदारांचा भ्रमनिरास झाला आहे. आता मात्र काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आत्मविश्वासाने आगामी नगरपालिका, जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीला सामोरे जावे. काँग्रेसला विजयी करण्यासाठी आपआपसातील मतभेदाला तिलांजली द्यावी, असे आवाहन शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष गजानन गावंडे यांनी शनिवारी येथे केले. बल्लारपूर तालुका व शहर काँग्रेसच वतीने आगामी नगरपालिका व जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर स्थानिक बालाजी सभागृहात काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा तालुकास्तरीय मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी अध्यक्षस्थानावरुन गावंडे बोलत होते. मेळाव्याला प्रमुख पाहुणे बल्लारपूर तालुका काँग्रेसचे अध्यक्ष घनश्याम मुलचंदानी, नगराध्यक्ष छाया मडावी, जिल्हा परिषद सदस्य रामभाऊ टोंगे, पंचायत समितीचे उपसभापती अनकेश्वर मेश्राम, माजी सभापती अ‍ॅड. हरीश गेडाम, माजी नगराध्यक्ष सुनंदा आत्राम, काँग्रेसचे शहर कार्याध्यक्ष तारासिंग कलशी, वसंतराव मांढरे, नगरपरिषद गटनेते देवेंद्र आर्य, नगरसेवक नासीर खान, टी. पद्माराव, मनोहर फुलझेले, रामदास वाग्दरकर, गुलाबराव मुरकुटे, देवेंद्र बेले यांची उपस्थिती होती. याप्रसंगी गावंडे म्हणाले की, चंद्रपूर जिल्ह्यात माजी खासदार नरेश पुगलिया यांचे कणखर नेतृत्व लाभले आहे. त्यांच्या नेतृत्व क्षमतेमुळे काँग्रेसची यशस्वी वाटचाल सुरू असून नगरपालिका व जिल्हा परिषद, पंचायत समितीमध्ये अनेकांना संधी मिळाली. काँग्रेसची विचारसरणी पुरोगामी असून सर्वसामान्याच्या विकास करणारी आहे. याच विचारधारेवर काँग्रेसला जनता मतदान करते. आगामी नगर पालिकेच्या निवडणुकीत काँग्रेसच विजयी होईल, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला. दरम्यान, रामभाऊ टोंगे, घनश्याम मुलचंदानी, वसंत मांढरे, तारासिंग कलशी, देवेंद्र आर्य, अनकेश्वर मेश्राम, यांनी मार्गदर्शन केले. संचालन नगरसेवक नासीर खान यांनी तर आभार रामदास वाग्दरकर यांनी मानले. यावेळी नगरसेवक भास्कर माकोडे, करुणा रेकलवार, वेणुताई गौरकार, कविता खरतड, जयकरण सिंह बजवे यांच्यासह शहरातील व ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती. (शहर प्रतिनिधी)