शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

बहिणीची छेड काढली, सरपंचाला भरचौकात चोप; गोंडपिपरीतील घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2022 11:21 IST

राजकीय वर्तुळात खळबळ

चंद्रपूर : बहिणीची छेड काढणाऱ्या सरपंचाला भावंडांनी भरचौकात चोप दिल्याची घटना गोंडपिपरी शहरात सोमवारी घडली. या घटनेने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे हा सरपंच एक मोठ्या राजकीय पक्षाचा पदाधिकारी आहे. या प्रकाराची तक्रार अद्यापही पोलिस स्टेशनला नसल्याची माहिती आहे.

सरपंच तथा एका मोठ्या राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्याने बसमध्ये एका मुलीची छेड काढली. ही बाब मुलीने घरी गेल्यानंतर आपल्या भावंडांना सांगितली. भावांचा संताप अनावर झाला. अशातच सोमवारी सरपंच तहसील कार्यालय परिसरात असल्याची माहिती त्या भावंडांना मिळाली. भावंडांनी गोंडपिपरी तहसील कार्यालय गाठले. सरपंचाची यथेच्छ धुलाई केली.

ही वार्ता गोंडपिपरी तालुक्यात वाऱ्यासारखी पसरली. विशेष म्हणजे धुलाई करताना अनेकांनी बघितले. मात्र सरपंचाला सोडवायला कुणीच गेले नाही. या घटनेची तालुक्यात खमंग चर्चा सुरू आहे. समाजमाध्यमात सरपंचाचे चांगलेच चिमटे काढले जात आहेत. दरम्यान माझ्यावर राजकीय वैमनस्यातून हल्ला करण्यात आला. मी कोणत्याही मुलीची छेडखानी केली नाही, अशी बाजू सरपंच समाजमाध्यमात मांडत आहे.

घटना घडल्याची चर्चा शहरात सुरू आहे. मात्र अद्याप कोणतीही तक्रार पोलिस स्टेशनला प्राप्त झाली नाही.

- जीवन राजगुरू, ठाणेदार, गोंडपिपरी

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMolestationविनयभंगsarpanchसरपंचchandrapur-acचंद्रपूर