शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
2
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
3
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
4
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
5
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
6
मोटो जी ८६ पॉवर 5G भारतात लॉन्च, जाणून घ्या खिसियत आणि किंमत!
7
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल
8
आई-वडिलांस पोटगी देण्यास नकार; मुलाची तुरुंगात रवानगी!
9
Big Breaking : ट्रम्प यांनी रशियाचा राग भारतावर काढला! २५% कर लादला; दंडही जाहीर केला
10
IND vs ENG : "त्यांनी जे केलं ते समजण्यापलिकडचं" पिच क्युरेटरसोबतच्या वादावर काय म्हणाला गिल?
11
कुत्रा चावल्याने बकरीचा मृत्यू झाला, पण नंतर एक आख्ख कुटुंब रुग्णालयात दाखल झालं
12
शिक्षिकेचे सैतानी कृत्य! खराब हस्ताक्षरामुळे विद्यार्थ्याला दिले मेणबत्तीचे चटके, मालाड येथील घटना
13
सर्वसामान्यांच्या 'लालपरी'ला येणार अच्छे दिन, एसटी महामंडळाचे वर्षाला १२ कोटी रुपये वाचणार!
14
ठाणे: १८ वर्षाच्या तरुणाने खड्ड्यामुळे गमावला जीव; जीमला निघाला पण रस्त्यातच झाला अपघात
15
बाप्पा पावला! कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी ४४ अतिरिक्त विशेष ट्रेन्सची घोषणा, पाहा वेळापत्रक
16
"२६ लोकांची हत्या झाली, राजीनामा पंडित नेहरू देणार की डोनाल्ड ट्रम्प?", संजय राऊतांचे सरकारवर टीकास्त्र
17
IND vs PAK, WCL 2025 Semi Final : भारतीय खेळाडूंनी पाक विरुद्ध सेमी फायनल खेळण्यासही दिला नकार
18
पृथ्वीला स्कॅन करणार, भूकंप-त्सुनामी होण्यापूर्वीच सांगणार; ISRO चे NISAR सॅटेलाईट लॉन्च
19
सांगलीतून अजून काही प्रवेश होतील का? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "जो प्रवेश अपेक्षित..."
20
भिवंडी वाडा रस्त्यावर खड्ड्याने घेतला युवकाचा बळी; संतप्त ग्रामस्थांचा रुग्णवाहिका रस्त्यावर ठेवत रास्तारोको

बाहेर फिरायला नेतो असे सांगत अल्पवयीन मुलीवर तिघांचा अत्याचार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2023 13:48 IST

दुर्गापूर येथील घटना : तीनही आरोपींना पोलिसांनी ठोकल्या बेड्या

दुर्गापूर (चंद्रपूर) : बाहेर फिरायला नेतो, असे सांगून तीन नराधमांनी आळीपाळीने एका १४ वर्षीय मुलीवर अत्याचार केल्याची खळबळजनक घटना शनिवारी दुपारच्या सुमारास उघडकीस आली. दुर्गापूर पोलिसांत तक्रार दाखल होताच तिघांना पोलिसांनी अटक केली आहे. गौरव रमेश शंखावार (वय २१, रा. इंदिरानगर), आशिक संदीप उराडे (१९, रा. रामकृष्ण चौक वानखेडे वाडी तुकुम), सर्वेश सुरेश हिवराळे (२२, रा. टाकनगर, अंजनगाव सुर्जी अमरावती, हल्ली मुक्काम जुने पोलिस वसाहत क्वाॅर्टर नंबर ५, तुकुम) असे अटकेतील आरोपींचे नाव आहेत.

१९ ऑगस्ट रोजी दुपारी २ वाजता पीडित मुलीची आई आपल्या कर्तव्यावरून घरी आली. दरम्यान, तिची १४ वर्षीय मुलगी घरी आढळून आली नाही. वाट बघून बराच वेळ उलटून गेल्यानंतरही ती घरी परतली नाही. परिसरात व नातेवाइकांकडे शोधाशोध केली. मात्र, ती कुठेच मिळाली नाही. म्हणून आईने शनिवारी दुर्गापूर पोलिस स्टेशन गाठून मुलीला कोणीतरी फूस लावून पळवून नेल्याची फिर्याद नोंदवली. यावरून दुर्गापूर पोलिसांनी कलम ३६३ अन्वये गुन्हा दाखल करून तपासाची चक्रे फिरवली.

रविवारी त्या मुलीचा शोध लागला. तिने महिला पोलिसांसमक्ष आपबीती सांगितली. लगेच पोलिसांनी मुलीवर अत्याचार करणाऱ्या गौरव शंखावार, आशिक उराडे, सर्वेश हिवराळे यांच्यावर कलम ३६३, ३७६ डीए भा.द.वि सहकलम ४ बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करून अटक केली आहे. पुढील तपास दुर्गापूरचे ठाणेदार अनिल जिट्टावार करीत आहेत.

दोन वेगवेगळ्या ठिकाणी केला अत्याचार

पीडित मुलगी पोलिसांना सापडल्यानंतर रामनगर पोलिस स्टेशनच्या पोलिस निरीक्षक लता वाढीवे यांनी तिचे पंचासमक्ष बयाण नोंदविले. यावेळी १९ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजेच्या दरम्यान सर्वेश हिवराळे, गौरव शंखावार यांनी तिला एका रूममध्ये नेले. दरम्यान आतून दरवाजा बंद करून सर्वेश हिवराळे याने तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर दुपारी आशिक उराडे व गौरव शंखावार यांनी पीडित मुलीला दुसऱ्या एका रूमवर नेऊन आळीपाळीने अत्याचार केल्याचे सांगितले.

आरोपींना तीन दिवसांची पोलिस कोठडी

दुर्गापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होताच पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवून तिघांनाही अटक केली. दुपारी पोलिसांनी तिघांना न्यायालयात हजर केले असता, न्यायधीशांनी तिघांनाही २४ ऑगस्टपर्यंत तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. पुढील तपास दुर्गापूरचे पोलिस निरीक्षक अनिल जिट्टावार करत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीSexual abuseलैंगिक शोषणchandrapur-acचंद्रपूर