शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

'शिक्षणा'साठी एक 'दानशूर' असाही !

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2024 16:49 IST

Chandrapur : गावातील विद्यार्थ्यांवर इकडे-तिकडे भटकण्याची वेळ येऊ नये म्हणून बाखर्डी या लहानशा गावातील एका दानशूराने स्वमालकीची कोट्यवधी रुपयांची जमीन दिली जिल्हा परिषदेला दान

चंद्रपूर : शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे, ते जो प्राशन करेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही असं डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी म्हटले आहे. बाबासाहेबांचे विचार आपल्या गावातील नागरिकांनाही समोर नेऊ शकते. आपल्या गावातील प्रत्येक जण शिकला पाहिजे. शिक्षण घेऊन ते उच्चपदावर पोहोचले पाहिजे. यासाठी प्रत्येकांना गावातच दर्जेदार शिक्षण मिळावे त्यांना इकडे-तिकडे भटकण्याची वेळ येऊ नये यासाठी कोरपना तालुक्यातील बाखर्डी या लहानशा गावातील एका दानशूराने स्वमालकीची कोट्यवधी रुपयांची जमीन जिल्हा परिषदेला दान दिली. या जमिनीवर शाळा इमारत उभी असून आजपर्यंत शेकडो जणांनी शिक्षण घेत आपले जीवन सुकर केले आहे. बबन पांडुरंग मत्ते असे या दानशूराचे नाव असून ते ८८ वर्षांचे आहेत.

कोरपना तालुक्यातील भोयेगाव-गडचांदूर मार्गावर बाखर्डी हे गाव आहे. गावात प्राथमिक शिक्षणाची सुविधा होती. पुढील शिक्षणासाठी गावातील विद्यार्थ्यांना इतरत्र शिक्षण घ्यायला जावे लागायचे. ही खदखद गावातील बबन पांडुरंग मत्ते यांना सतावत होती. आपल्या गावातील विद्यार्थ्यांना गावात दर्जेदार शिक्षण मिळावे यासाठी त्यांची सारखी धडपड सुरू होती. त्यांची ही धडपड त्यांना स्वस्त बसू देत नव्हती. यासाठी त्यांनी १९९१ ला जिल्हा परिषद प्रशासनाकडे विनंती केली आणि गावात ८ ते १० वीपर्यंत शाळा सुरू करण्याची मागणी केली. मात्र गावात असलेल्या प्राथमिक शाळेमध्ये जागा अपुरी पडत असल्याची बाब अधिकाऱ्यांनी समोर केली. 

यावेळी मात्र त्यांनी कोणताही विचार न करता गावाच्या भल्यासाठी भोयेगाव- गडचांदूर मार्गावरील आपल्या मालकीची कोट्यवधी रुपयांची जमीन जिल्हा परिषद शाळेसाठी दान देण्याची तयारी केली. तयारी करूनच ते थांबले नाही तर जिल्हा परिषदेतील अधिकाऱ्यांना जमीन दान देण्याचे संपूर्ण सोपस्कार पार पाडले. त्यांनी जिल्हा परिषद अधिकाऱ्यांच्या हातात जमीन दान दिल्याचे कागदपत्र दिले. त्यानंतर मात्र गावात ८ ते १० वीची शाळेची इमारत बांधून त्यांच्या जागेवर शाळा सुरू करण्यात आली. आजपर्यंत या शाळेतून शेकडो विद्यार्थ्यांनी ज्ञानार्जन केले आहे. यातील अनेक जण विविध ठिकाणी मोठमोठ्या पदावर अधिकारी, कर्मचारी म्हणून कार्यरत आहे. तर काही डॉक्टर, वकीलसुद्धा झाले आहे. हे सर्व बघून बबन मत्ते यांना समाधान वाटत असले तरी सध्याची शाळेतील विद्यार्थ्यांची घटलेली संख्याही त्यांना फार सतावत आहे.

केवळ ज्ञानार्जनासाठीच व्हावा वापर■ दिवसेंदिवस जिल्हा परिषद शाळांतील स्थिती बिकट होत आहे. बाखर्डी येथीलही शाळेतील विद्यार्थी संख्या सध्या घटली आहे. त्यामुळे भविष्यात ही शाळा बंद पडू नये, आपण ज्या उद्देशाने शाळेला जमीन दान दिली. तिचा उपयोग केवळ ज्ञानार्जना- साठीच व्हावा, अशी इच्छाही बबन मत्ते यांनी व्यक्त केली आहे.

खासगी शाळाही सुरू करता आली असती■ सामाजिक कार्याने झपाटलेल्या बबन मत्ते यांनी केवळ समाजासाठी काहीतरी करण्याचाच विचार केला. इतरांसारखी त्यांनीही शाळा सुरू करून स्वतःचे नाव करता आले असते, अनेकांना त्या शाळेत नोकरीसुद्धा लावता आली असती, मात्र मुळात सामाजिक कामच करण्याचा त्यांचा उद्देश असल्याने त्यांनी कोणत्याही भानगडीत पडण्याचा विचारसुद्धा केला नाही. आपल्या मालकीची गडचांदूर-भो- येगाव या रोडवरील जमीन दान देऊन विद्यार्थ्यांना शिक्षणाचे दालन उभे केले.

 

टॅग्स :chandrapur-acचंद्रपूरEducationशिक्षण