शहरं
Join us  
Trending Stories
1
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
2
डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकला 'टॅरिफ' बॉम्ब! भारतावर लादला तब्बल ५० टक्के कर, आदेशावर केली स्वाक्षरी
3
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
4
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
5
बापाचा दारु प्यायल्यामुळे मृत्यू, बारचालकांचा बदला घेण्यासाठी मुलगा बनला चोर; सगळं प्रकरण ऐकून पोलिसही चक्रावले
6
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
7
Ankita Lokhande: मुंबई पोलिसांचे आभार... 'त्या' दोन बेपत्ता मुली सुखरूप; अंकिता लोखंडेने दिली माहिती
8
Mumbai Rape: प्रशिक्षणाच्या नावाखाली १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, क्रिकेट प्रशिक्षकाला अटक
9
यंदा चिंचपोकळीच्या ‘चिंतामणी’चं आगमन कधी? गणेशभक्तांनो 'ही' तारीख ठेवा लक्षात!
10
डोनाल्ड ट्रम्प यांनी केली उत्तराधिकाऱ्याची घोषणा, जाहीर केलं या नेत्याचं नाव    
11
संघाचा शतकमहोत्सव थाटात साजरा होणार, कार्यक्रमांची रेलचेल, देशोदेशीच्या दूतावासांना निमंत्रण, पण...
12
Dharali Cloud Burst: उरले फक्त दगड आणि गाळ! ढगफुटीनंतरचा धरालीतील पहिला ड्रोन व्हिडीओ
13
Vaishnavi Patil : छोरियां छोरों से कम नहीं! कल्याणच्या ढाबा चालकाच्या लेकीची कुस्तीत मोठी झेप, दिग्गजांना केलं चितपट
14
मुंबईत भरणार 'क्रीडा महाकुंभ'! लेझीम, फुगडीसह शिवकालीन पारंपरिक खेळांना मिळणार पुनर्वैभव
15
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
16
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
17
विकेटची गॅरेंटी देणारा बुमराहच ठरतोय टीम इंडियासाठी 'पनौती'? भयावह आकडेवारीवर सचिन तेंडुलकर म्हणाला...
18
निर्वस्त्र करुन मारहाण, एक्स गर्लफ्रेंडसोबत संबंध; मर्चंट नेव्ही अधिकाऱ्याच्या पत्नीने संपवले आयुष्य
19
मोहम्मद सिराजचा मोठा पराक्रम, गोलंदाज असूनही मोडला धोनीचा रेकॉर्ड!
20
कधी भूस्खलन तर कधी ढगफुटी; नैसर्गिक की मानवी चूक? उत्तराखंड विनाशाच्या वाटेवर...

दारू न पिणाऱ्यांनाही होणारा आजार; 'लिव्हर सिरॉसिस'ला कसे दूर ठेवाल?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2025 17:47 IST

Chandrapur : लिव्हर सिरॉसिसची प्रमुख कारणे काय ?

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : यकृत हा शरीरातील सर्वांत महत्त्वाचा अवयव. अन्नाचे पचन, विषारी घटकांचे शुद्धीकरण, रोगप्रतिकारक शक्ती निर्माण करणे ही यकृताची मुख्य कामे. पण जेव्हा यकृताच्या पेशींना सतत इजा पोहोचते, तेव्हा त्या पेशी जखमी होतात आणि त्याजागी तंतुमय ऊतक निर्माण होतो. ही स्थिती म्हणजेच लिव्हर सिरॉसिस'. या अवस्थेत यकृताचे कार्य मंदावते, त्याचा आकारही बदलतो. लक्षणे सुरुवातीला सौम्य असतात, पण वेळेत लक्ष न दिल्यास स्थिती गंभीर बनते, त्यामुळे वेळीच लक्ष द्यावे, असा सल्ला जनरल फिजिशियन डॉ. अमित ढवस यांनी दिला आहे.

२१ व्या शतकातील प्रगत तंत्रज्ञानाच्या काळात जीवनशैलीत आमूलाग्र बदल झाला आहे. विकेंडच्या नावाखाली हॉटेलिंग, पार्टीचे फॅड मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. त्यामुळे सुदृढ जीवनशैली ही कालबाह्य होत आहे. यातूनच विविध आजाराला आमंत्रण दिले जात आहे. 'लिव्हर सिरॉसिस' हा त्यातीलच एक प्रकार आहे. हा आजार गंभीर रूप धारण करण्यापूर्वी उपचार करणे गरजेचे असते. 

दारू न पिणाऱ्यांनाही होतो लिव्हर सिरॉसिसअनेकांना गैरसमज असतो की लिव्हर सिरॉसिस फक्त मद्यपान करणाऱ्यांनाच होतो. पण आता याचे प्रमाण नॉन अल्कोलिक फॅटी लिव्हर डिसीज आणि मधुमेह, लठ्ठपणा, कोलेस्टेरॉल असणाऱ्यांमध्येही वाढले आहे.

लिव्हर लहान व कडक बनते, खराब होतेयकृताची रचना बदलते. तो लहान, खवखवीत व कठीण होतो. त्यामुळे त्याचे रक्तप्रवाह कमी होतो आणि कार्यक्षमता घटते. त्यामुळे लक्षणे दिसताच वेळीच तज्ज्ञांना दाखवून उपचार करणे गरजेचे आहे, अन्यथा आजार बळावण्याची शक्यता असते.

ही लक्षणे आढळल्यास तपासण्या कराथकवा, भूक मंदावणे, पोट फुगणे, डोळे व त्वचा पिवळी होणे, सतत उलटीचा त्रास, चक्कर, भ्रम, शरीरावर निळसर डाग आदी लक्षणे दिसून आल्यास वेळीच तज्ज्ञांना दाखवणे गरजेचे आहे.

या आजारापासून वाचण्यासाठी काय कराल?दारूपासून दूर राहा, फॅटी लिव्हरचा वेळेवर उपचार घ्या, योग्य आहार, हिरव्या भाज्या, नियमित व्यायाम करा, औषधांचा अतिरेकी वापर टाळा, हिपॅटायटिस लस वेळेवर घ्या, दरवर्षी लिव्हर तपासणी करा.

'लिव्हर सिरॉसिस' म्हणजे यकृताचे विघटनसिरॉसिस ही यकृताच्या पेशींना सतत इजा झाल्याने निर्माण होणारी स्थायिक (क्रॉनिक) स्थिती आहे. यात पेशी नष्ट होतात आणि त्यांच्या जागी 'फायब्रॉसिस' म्हणजेच तंतुमय ऊतक तयार होते.

विसरभोळेपणा, चक्कर, गोंधळलेली स्थितीमेंदूपर्यंत पोहोचणाऱ्या विषारी घटकांचे शुद्धीकरण यकृत नीट करू शकत नाही. त्यामुळे व्यक्ती गोंधळलेली, चिडचिडी होते, चक्कर येते, काही वेळा स्मृतिदोष किंवा भ्रमदेखील निर्माण होतो.

लिव्हर सिरॉसिसची प्रमुख कारणे काय ?अत्याधिक मद्यपान, हिॉटायटिस बी व सी सारखे विषाणूजन्य आजार, फॅटी लिव्हर, औषधांचा अति व अपायकारक वापर, अनुवंशिक विकार आदी प्रमुख कारणे दिसून येतात.

"लिव्हर सिरॉसिसची सुरुवात गुप्त आणि सौम्य असते. त्यामुळे लक्षणांकडे दुर्लक्ष करू नये. नॉन अल्कोलिक लिव्हर सिरॉसिस हे नव्या पिढीत मोठ्या प्रमाणात आढळते. त्यामुळे योग्य आहार, व्यायाम आणि नियमित तपासणी या त्रिसूत्रीचा वापर करणे गरजेचे आहे."- डॉ. अमित ढवस, जनरल फिजिशियन, चंद्रपूर

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सchandrapur-acचंद्रपूर