धाबा येथे सांस्कृतिक सभागृहासाठी ९८ लाख मंजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2018 00:19 IST2018-11-02T00:18:52+5:302018-11-02T00:19:09+5:30

राज्याचे अर्थमंत्री तथा चंद्रपूर जिल्हयाचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने गोंडपिपरी तालुक्यातील श्री संत परमहंस कोंडय्या महाराज संस्थान, धाबा येथे सांस्कृतिक सभागृहाच्या बांधकामासाठी ९७ लाख ८३ हजार रूपये इतका निधी मंजूर करण्यात आला आहे.

98 lakh sanctioned for cultural hall in Dhaba | धाबा येथे सांस्कृतिक सभागृहासाठी ९८ लाख मंजूर

धाबा येथे सांस्कृतिक सभागृहासाठी ९८ लाख मंजूर

ठळक मुद्देअर्थमंत्र्यांनी दिलेला शब्द केला पूर्ण

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : राज्याचे अर्थमंत्री तथा चंद्रपूर जिल्हयाचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने गोंडपिपरी तालुक्यातील श्री संत परमहंस कोंडय्या महाराज संस्थान, धाबा येथे सांस्कृतिक सभागृहाच्या बांधकामासाठी ९७ लाख ८३ हजार रूपये इतका निधी मंजूर करण्यात आला आहे.
शासनाच्या पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाने ३१ आॅक्टोबर रोजी याबाबतचा शासन निर्णय निर्गमित केला आहे. राजुरा विधानसभा क्षेत्राचे आमदार अ‍ॅड. संजय धोटे आणि जिल्हा परिषद सदस्य वैष्णवी बोडलावार यांच्या मागणीच्या अनुषंगाने अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिलेला शब्द पूर्ण केला आहे.
गोंडपिपरी तालुक्यातील श्री क्षेत्र धाबा येथील संत परमहंस कोंडय्या महाराज संस्थान येथे सांस्कृतिक सभागृहाचे बांधकाम करण्याची मागणी राजुरा विधानसभा क्षेत्राचे आमदार अ‍ॅड. संजय धोटे आणि जिल्हा परिषद सदस्य वैष्णवी बोडलावार यांनी एका कार्यक्रमात अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे केली होती. अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी त्यांना तेव्हा ही मागणी पूर्ण करण्याचे आश्वासन दिले होते. दिलेल्या आश्वासनाची त्यांनी पूर्तता केली असून पर्यटन स्थळांच्या ठिकाणी पायाभूत सुविधा पुरविण्यासाठी प्रादेशिक पर्यटन योजनेअंतर्गत सदर निधी मंजूर करण्यात आला आहे. धाबा येथील संत परमहंस कोंडय्या महाराज संस्थान अतिशय प्रसिध्द तिर्थस्थळ व पर्यटन स्थळ असून या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर भाविक दर्शनासाठी येत असतात. प्रत्येक माघ शुध्द तृतीयेला या ठिकाणी मोठी यात्रा भरते. याठिकाणी सांस्कृतिक सभागृह आवश्यक होते. आता या मागणीची पूर्तता झाली आहे.

Web Title: 98 lakh sanctioned for cultural hall in Dhaba

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.