९७ हजार ४६६ मतदार ६१६ ग्रामपंचायत सदस्यांना निवडून देणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2020 04:25 IST2020-12-24T04:25:54+5:302020-12-24T04:25:54+5:30
७८ ग्रामपंचायतींची निवडणूक १५ जानेवारीला होणार आहे. मतमोजणी १८ जानेवारीला वरोरा- मोहबाळा रस्त्यालगतच्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात ...

९७ हजार ४६६ मतदार ६१६ ग्रामपंचायत सदस्यांना निवडून देणार
७८ ग्रामपंचायतींची निवडणूक १५ जानेवारीला होणार आहे. मतमोजणी १८ जानेवारीला वरोरा- मोहबाळा रस्त्यालगतच्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात घेण्यात येणार आहे. निवडणूक निर्णय अधिकारी १३ सहाय्यक निवडणूक अधिकारी१३ तर एक हजार ५०० कर्मचारी नियुक्त केले जाणार आहे. २३ ते ३० डिसेंबर सकाळी दहा ते दुपारी तीन वाजेपर्यंत नामनिर्देशन पत्र सादर करता येणार आहे सकाळी अकरा ते दुपारी तीन वाजेपर्यंत सार्वजनिक सुट्टीचे दिवस वगळून नामनिर्देशन पत्र छाननी ३१ डिसेंबर नामनिर्देशनपत्र मागे घेणे ४ जानेवारी दुपारी तीन वाजेपर्यंत निवडणूक चिन्ह व अंतिम याद्या ४ जानेवारी रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे, अशी माहिती निवडणूक अधिकारी व प्रभारी तहसीलदार रमेश कोळपे यांनी दिली. २७५ मतदान मशीन मतपत्रिका रंगित तालुक्यात २७५ यंत्राद्वारे मतदान घेण्यात येणार आहे अनुसूचित जातीकरिता फिक्कट गुलाबी अनुसूचित जमातीकरिता फिक्कट हिरवा ओबीसीकरिता फिक्कट पिवळा तर सर्वसाधारणाकरिता पांढऱ्या रंगाची मतपत्रिका वापरली जाणार आहे. खांबाळा बोर्ड, उखर्डा खेमजी, वडगाव, साखरा कोसर असार शेगाव चारगाव बू ही संवेदनशील केंद्र म्हणून घोषित करण्यात आली.