९६ हजार मतदार बजावणार मतदानाचा हक्क
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2021 04:22 IST2021-01-15T04:22:56+5:302021-01-15T04:22:56+5:30
सिंदेवाही : तालुक्यातील ४४ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा प्रचार काल थंडावला. उमेदवारांनी मतदारांना खुश करण्याचा प्रयत्न केला. तालुक्यात ९६ हजार ३३८ ...

९६ हजार मतदार बजावणार मतदानाचा हक्क
सिंदेवाही : तालुक्यातील ४४ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा प्रचार काल थंडावला. उमेदवारांनी मतदारांना खुश करण्याचा प्रयत्न केला. तालुक्यात ९६ हजार ३३८ मतदार १५ जानेवारीला मतदानाचा हक्क बजावणार आहेत.
त्यात नवरगाव, रत्नापूर, लोन वाही, मोहाडी, वासेरा, शिवनी, मेंढा, कळमगाव, सरट पार, पेडगाव, जामताडा, गुंजेवाही, गडबोरी, टेकरी, चीक मारा, देलनवाडी, अंतरगाव, लाडबोरी तसेच इतर गावांची निवडणूक होत आहे. तालुक्यातील ४४ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी उद्या प्रशासन सज्ज झाले आहे. पोलिसांचा कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. निवडणुकीसाठी जिल्हा परिषद शाळा अंगणवाडी केंद्राची मतदान केंद्र म्हणून निवड करण्यात आली आहे. ग्रामपंचायत निवडणुकीसाठी विवी पॅड उपयोग केला जाणार नाही. तालुक्यात अनेक प्रभागांत दोन किंवा तीन उमेदवारांना निवडून द्यायचे आहे. तालुक्यातील ४४ ग्रामपंचायतीमध्ये १३२ वॉर्डांत निवडणूक पार पडणार आहे.