शहरं
Join us  
Trending Stories
1
कोव्हिशिल्ड साईड इफेक्ट: दोन मृत मुलींचे पालक सीरम इन्स्टिट्यूटला कोर्टात खेचणार
2
ठाकरे गटाला पॉर्न संस्कृती रुजवायची आहे का? चित्रा वाघ यांचा हल्लाबोल
3
"ज्या बूथवर काँग्रेसला एक मतही मिळणार नाही, तिथे 25 लाखांची विकासकामं केली जातील"
4
Rahul Gandhi : "न रहेगा बांस, न बजेगी बांसुरी म्हणजे सरकारी नोकऱ्या नाहीत, आरक्षण नाही"; राहुल गांधींचा घणाघात
5
उद्धव ठाकरेंनी मागितली संभाजीराजेंची माफी; "आम्ही शेण खाल्लं म्हणून तुम्ही..."
6
Lok Sabha Election 2024: लोकसभेला 'मविआ' किती जागा जिंकणार? विधानसभा निवडणुकीत काय घडणार? Jayant Patil यांनी केले २ मोठे दावे
7
Health Tips: उन्हाळ्यात प्रकृती थंड ठेवण्यासाठी आहारतज्ज्ञ ऋजुता दिवेकरांनी सांगितला SST फॉर्म्युला!
8
मनसे नेते अमित ठाकरेंचं शालेय शिक्षणमंत्र्यांना पत्र; RTE प्रवेश प्रक्रियेवरून नाराजी
9
'देशात काँग्रेस संपत असताना पाकिस्तानला रडू येतंय'; व्होट जिहादवरुन मोदींचा निशाणा
10
कोव्हिशील्ड घेतलेल्यांना सर्वात महत्वाची गोष्ट सांगायची राहूनच गेली! रवी गोडसेंनी सांगितला पुढचा 'धोका...'
11
Guru Asta 2024: गुरु अस्त काळात होणार राजकीय उलथापालथ? मंगल कार्य वर्ज्य? वाचा उपाययोजना!
12
Gold Price Today: सोन्याच्या किंमतीत झाली मोठी घसरण, ७५००० च्या उच्चांकावरून ७१००० रुपयांवर आलं गोल्ड
13
Goldy Brar Murder : गोल्डी ब्रारच्या हत्येची बातमी अफवा; अमेरिकन पोलिसांनी केले स्पष्ट
14
कोकणात दादा आणि भाईंचं मनोमीलन कसं झालं? खुद्द केसरकर यांनीच सांगितली 'इनसाईड स्टोरी'   
15
ब्रिजभूषण यांचे पुत्र करण भूषण सिंह यांना भाजपा तिकीट देणार, सूत्रांची माहिती
16
Uma Bharti : "काँग्रेसने सत्ता मिळवण्यासाठी देशाचे विभाजन केले"; उमा भारतींची राहुल-सोनिया गांधींवर टीका
17
अहो आश्चर्यम्! मारुतीच्या नव्या स्विफ्टला मिळाली ४ स्टार सेफ्टी रेटिंग; जपानमध्ये क्रॅश टेस्ट
18
Multibagger Stock : सलग तिसऱ्या दिवशी 'या' कंपनीच्या शेअरला अपर सर्किट; वर्षभरापासून करतोय मालामाल
19
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : भाजपचे माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण अपक्ष निवडणूक लढवणार
20
'अस्वस्थ झाला असतात तर ८४ वर्ष जगला नसता';नारायण राणेंचं शरद पवारांना प्रत्युत्तर

जिल्ह्यातील ९६ तलावांमध्ये ५० टक्केच जलसाठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2020 6:00 AM

मागील वर्षीचा हंगाम शेतकऱ्यांसाठी अभिशाप ठरला. मोठ्या उत्साहाने पैशाची जुळवाजुळव करुन शेतकरी गतवर्षी खरीपासाठी उभा झाला. मात्र वरूणराजाने त्याचे कंबरडेच मोडले. यावर्षीही पावसाने अनेकवेळा शेतकऱ्यांना दगा दिला. परिणामी शेतकऱ्यांना पिके वाचविताना मोठी कसरत करावी लागली होती. कशीबशी शेतकऱ्यांनी आपली पिके वाचविली. मात्र उत्पादनावर मोठा परिणाम झाला.

ठळक मुद्देपातळी झपाट्याने खालावतेय : वापर जपून न केल्यास पाणी टंचाई अटळ

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : मामा तलावांना शेतकऱ्यांचे सुरक्षित सिंचन समजले जाते. मात्र हेच सुरक्षित सिंचन आता धोक्यात आले आहे. यावर्षी अत्यल्प पाऊस पडल्यामुळे जलाशयात पाणी साठू शकले नाही. चंद्रपूर जिल्ह्यात एकूण ९७ मामा तलाव आहेत. मात्र या तलावातील जलसाठ्याची स्थिती आतापासून चिंताजनक आहे. आसोलामेंढा हा मोठा तलाव वगळला तर इतर ९६ तलावांमध्ये ५० टक्क्यापर्यंत जलसाठा शिल्लक आहे. या पाण्याचा आताच गंभीरतेने आणि जपून वापर न केल्यास मुबलक पाऊस पडूनही यंदा उन्हाळ्यात पाण्याची तीव्र टंचाई भासू शकते.मागील वर्षीचा हंगाम शेतकऱ्यांसाठी अभिशाप ठरला. मोठ्या उत्साहाने पैशाची जुळवाजुळव करुन शेतकरी गतवर्षी खरीपासाठी उभा झाला. मात्र वरूणराजाने त्याचे कंबरडेच मोडले. यावर्षीही पावसाने अनेकवेळा शेतकऱ्यांना दगा दिला. परिणामी शेतकऱ्यांना पिके वाचविताना मोठी कसरत करावी लागली होती. कशीबशी शेतकऱ्यांनी आपली पिके वाचविली. मात्र उत्पादनावर मोठा परिणाम झाला. पाहिजे तसे उत्पादन शेतकऱ्यांच्या हाती येत नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे शेतकरी पुन्हा कर्जाच्या खाईत लोटला गेला. लावलेला पैसाही निघाला नाही. त्यामुळे डोक्यावरील कर्ज तो फेडू शकला नाही. यवर्षी शासनाने कर्जमाफीची घोषणा केल्यानंतर शेतकऱ्यांला दिलासा मिळाला. मात्र हा आनंद क्षणिक ठरला. खरीप हंगाम संपला तरीही अनेक शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळाला नाही. आता शेतकरी पुन्हा रबी हंगामाच्या कामात व्यस्त आहे. गहू, हरभरा, भुईमूग, लाखोळी व दुबार धान पिकांची लागवड करण्यात आली आहे. सध्या जिल्ह्यात ९७ पैकी ९६ मामा तलावांमध्ये एकूण सरासरी ५० टक्के जलसाठा आहे. ग्रामीण भागात पसरलेले हे मामा तलावांचे जाळे शेतकºयांसाठी वरदान आहेत. फेब्रुवारी महिन्यातच तलावातील जलसाठा ५० टक्क्यावर आल्यामुळे चिंता वाढली आहे.असा आहे तलावातील जलसाठाचंद्रपूर जिल्ह्यात एकूण ९७ मामा तलाव आहेत. यात आसोलामेंढा नामक मोठा तलाव आहे. आठ मध्यम मामा तलाव आहेत. तर ८८ लघू मामा तलाव आहेत. आसोलामेंढा या मोठ्या तलावात ९१.९७ टक्के जलसाठा शिल्लक आहे. आठ मध्यम तलावात ५०.०८ टक्के जलसाठा आहे तर उर्वरित ८८ लघू मामा तलावात ५०.०० टक्के पाणी शिल्लक आहे.

टॅग्स :Irrigation Projectsपाटबंधारे प्रकल्प