सोने विकायचा बहाणा करीत ९४ हजार रु. हिसकावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2021 04:29 IST2021-07-27T04:29:06+5:302021-07-27T04:29:06+5:30

वरोरा : सोने विकायचे आहे, असा बहाणा करीत एका व्यक्तिला वरोरा येथे बोलावत त्याच्याकडील ९४ हजार रुपये हिसकावणाऱ्या दोघांना ...

94,000 under the pretext of selling gold. Snatched | सोने विकायचा बहाणा करीत ९४ हजार रु. हिसकावले

सोने विकायचा बहाणा करीत ९४ हजार रु. हिसकावले

वरोरा : सोने विकायचे आहे, असा बहाणा करीत एका व्यक्तिला वरोरा येथे बोलावत त्याच्याकडील ९४ हजार रुपये हिसकावणाऱ्या दोघांना वरोरा पोलिसांनी अटक केली.

राहुलबिहारी अशोक पीटर (रा. विजयनगर, इंदोर) असे फिर्यादीचे नाव आहे. सोनू उर्फ दीपक पवार (रा. वणी) व त्याचे दोन मित्र यांनी सोने विकायचे आहे, असा बहाणा बनवून फिर्यादीस वरोरा येथे बोलावले. त्यानंतर फिर्यादीजवळ असलेले ९४ हजार रुपये जबरदस्तीने हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला. याबाबत राहुलबिहारी यांनी वरोरा पोलिसात तक्रार दाखल केली. पोलिसांनी सोनू उर्फ दीपक तुकाराम पवार (३८, रा. वणी) व रवी काशिनाथ पवार (२७, रा. देवसरी, तालुका उमरखेड) यांना अटक केली. ही कारवाई पोलीस निरीक्षक दीपक खोब्रागडे यांच्या मार्गदर्शनात सर्वेश बेलसरे, दीपक दुबे, दिलीप सुर यांनी केली.

Web Title: 94,000 under the pretext of selling gold. Snatched