शहरं
Join us  
Trending Stories
1
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
2
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
3
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
4
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
5
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
6
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
7
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
8
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
9
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
10
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
11
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
12
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
13
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
14
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
15
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
16
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
17
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
18
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
19
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
20
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
Daily Top 2Weekly Top 5

चंद्रपुरात ७७८ गावे बाधित, ११,२२९ हेक्टर शेतीचे नुकसान

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2024 08:40 IST

गोसेखुर्दचे ३३ दरवाजे दीड मीटरने उघडण्यात आले; गोंदियात पिके पाण्याखाली, पुरामुळे दहा मार्ग बंद

लोकमत न्यूज नेटवर्क चंद्रपूर : पूर्व विदर्भात तीन ते चार दिवसांपासून सलग जोरदार पाऊस झाल्याने नदी-नाल्यांना पूर आला आहे. शेकडो घरांमध्ये पावसाचे पाणी शिरले असून शेतीचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. 

चंद्रपूर जिल्ह्यात दोन दिवसातील पावसामुळे पूरपरिस्थिती निर्माण होऊन ११ हजार २२९.४० हेक्टर क्षेत्रातील पिकांना तडाखा बसल्याची प्राथमिक माहिती आहे. पुरामुळे ७७८ गावे बाधित झाली. मूल व सावली तालुक्यात नुकसानीची तीव्रता अधिक आहे. पुरामुळे १५ हजार ५२५ शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले. तलाव फुटल्याने हाहाकार उडालेल्या चिचपल्ली गावातील पाणी ओसरले; पण पुराच्या पाण्याने अनेकांच्या घरांची पडझड झाली. जीवनावश्यक वस्तू वाहून गेल्या.

पिके सडण्याचा धोका nगोंदिया : जिल्ह्यात तीन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाचा जोर सोमवारी चौथ्या दिवशीही कायम होता. nत्यामुळे नदी-नाल्यांना पूर आला असून, आठ ते दहा मार्ग अद्यापही बंद आहेत.  nतीन दिवसांपासून हजारो हेक्टरमधील पिके पाण्यात गेली. 

पुराचा फटका; १,५५५ कुटुंबांना हलविलेnभंडारा : आसगाव (ता. पवनी) तर ओपारा, राजनी (ता. लाखांदूर) येथे अतिवृष्टीचा तडाखा बसला.nतिन्ही गावे मिळून एकूण १,५५५ कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. जिल्ह्यातील १३ मंडळात अतिवृष्टी झाली.

पंचगंगेने ओलांडली इशारा पातळीकोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात साेमवारी पावसाचा जोर कमी झाला असला, तरी पंचगंगा नदीने सकाळी इशारा पातळी (३९.२ फूट) ओलांडली. तब्बल ७८ बंधारे आणि ३८ मार्गांवर पाणी आल्याने वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. धरणक्षेत्रात अद्याप पाऊस सुरू आहे. राधानगरी धरण ८५% भरले, त्यातून प्रतिसेकंद १४५० घनफूट विसर्ग सुरू आहे.  

कृष्णा खोऱ्यात जोरसांगली : कृष्णा नदीची पाणीपातळी सोमवारी दुपारी २६ फुटांपर्यंत पोहोचली. कृष्णा खोऱ्यात पावसाचा जोर असल्यामुळे अलमट्टी धरण प्रशासनाने एक लाख ५० हजार क्युसेकने विसर्ग सुरू केला आहे.  

टॅग्स :floodपूरRainपाऊस