७० पेट्या देशीदारू जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:42 IST2021-02-05T07:42:49+5:302021-02-05T07:42:49+5:30
चंद्रपूर : स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मूल-चंद्रपूर मार्गावर नाकाबंदी सुमारे ७० देशीदारूच्या पेट्या जप्त केल्या. बुधवारी मध्यरात्री केलेल्या कारवाईत ...

७० पेट्या देशीदारू जप्त
चंद्रपूर : स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मूल-चंद्रपूर मार्गावर नाकाबंदी सुमारे ७० देशीदारूच्या पेट्या जप्त केल्या. बुधवारी मध्यरात्री केलेल्या कारवाईत एकाला अटक करण्यात आली. अभिजित ऊर्फ सूरज राजेंद्र कुरेकार (रा. इंदिरानगर) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.
स्थानिक गुन्हे शाखेचे पथक गस्तीवर असताना दारूची वाहतूक होत असल्याची गुप्त माहिती मिळाली. या माहितीच्या आधारावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मूल-चंद्रपूर मार्गावर नाकाबंदी केली. यावेळी संशयित वाहन येताच त्या वाहनाला थांबविण्यात आले. वाहनाची तपासणी केली असता, वाहनात देशीदारू आढळून आली. पोलिसांनी सर्व ७० पेट्या देशीदारू व वाहन जप्त करून वाहनचालकाला अटक केली. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांच्या नेतृत्वात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली. मागील काही दिवसापूर्वी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ट्रकभरून दारुसाठा पकडला होता. आता पुन्हा कारवाई केल्याने दारू विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहे.