शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर परत मी लोकसभा निवडणूक लढवणार नाही; भोरमध्ये अजित पवारांची घोषणा
2
सोढीचं शेवटचं लोकेशन, ATM मधून काढले 7 हजार; गुरुचरण सिंग अचानक बेपत्ता, गूढ कायम
3
देवेंद्र फडणवीस पवारांना काटशह देणार?; अभिजीत पाटलांच्या भाजप प्रवेशाची चर्चा
4
धमक्या कशाला देता? ४ जूनला जनताच तुम्हाला बघून घेईल - संजय राऊत
5
Sunita Kejriwal : "प्रत्येकजण हुकूमशाही हटवण्यासाठी आणि लोकशाही..."; सुनीता केजरीवाल यांचा रोड शो
6
दादा-भाईंचं मनोमीलन, बदलणार का सिंधुदुर्गातलं समीकरण?, असं आहे गणित... 
7
Sangli: प्रकाश शेंडगेंच्या मोटारीला चपलांचा हार, काळे फासले, धमकीचे पत्रही लावले
8
याला म्हणतात नशीब! बॉयफ्रेंडच्या 'त्या' एका सल्ल्याने 'ती' झाली लखपती; मिळाले 41 लाख
9
"रावणानं सीतेचं हरण केलं आणि नरेंद्र मोदी यांनी…” काँग्रेसच्या महिला नेत्याची बोचरी टीका
10
शेव्हिंग कंपनीने टॉपर प्राचीच्या समर्थनार्थ दिली पानभर जाहिरात; शेवटचा सल्ला वाचून नेटकऱ्यांचा संताप अनावर
11
वर्षा गायकवाडांविरोधात कसं लढणार? उज्ज्वल निकम म्हणाले, ‘कोर्टात समोरच्याला…’
12
भाजपा आमदाराच्या गाडीवर अज्ञातांकडून हल्ला, दगडफेकीत समोरील काच फुटली
13
Sahil Khan : अभिनेता साहिल खानच्या अडचणीत वाढ; महादेव बेटिंग App प्रकरणी मुंबई पोलिसांची मोठी कारवाई
14
J P Nadda : "ही ममता बॅनर्जींची सर्वात मोठी चूक, तुम्ही बंगालचं काय केलं?"; जेपी नड्डा यांचा हल्लाबोल
15
नरेंद्र मोदी आज कर्नाटकात करणार वादळी प्रचार, दिवसभरात 4 सभांचे आयोजन
16
‘अमित शाह, योगी आदित्यनाथ यांनी कोकणात यायच्या भानगडीत पडू नये, इथे आल्यास…’, भास्कर जाधव यांचा इशारा
17
"ते म्हणतात की, मी अपवित्र आहे, कारण...", कंगनाचा विक्रमादित्य यांच्यावर जोरदार हल्लाबोल
18
प्रचाराच्या रणधुमाळीदरम्यान मुंबईतील भांडुपमधून तीन कोटींची रोकड जप्त, तपास सुरू
19
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
20
आमिरला पहिल्या पत्नीने लगावली होती कानशिलात, नेमकं काय घडलं होतं? अभिनेत्याने केला खुलासा

खरिपासाठी लागणार ६८ हजार क्विंटल बियाणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2018 11:35 PM

खरीप हंगाम तोंडावर असून मशागतपूर्व कामासाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू आहे. यावर्षी शेतकऱ्यांना बियाणे व खताचा मुबलक प्रमाणात पुरवठा व्हावा, यासाठी कृषी विभागाने तसे नियोजन केले आहे.

ठळक मुद्देशेतकऱ्यांची लगबग : सद्यस्थितीत ४ हजार ४६९ क्विंटल बियाणे उपलब्ध

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : खरीप हंगाम तोंडावर असून मशागतपूर्व कामासाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू आहे. यावर्षी शेतकऱ्यांना बियाणे व खताचा मुबलक प्रमाणात पुरवठा व्हावा, यासाठी कृषी विभागाने तसे नियोजन केले आहे. यावर्षीच्या खरिप हंगामासाठी सार्वजनिक व खासगी अशी ६८ हजार ८०५.३० क्विंटल बियाण्यांची मागणी असून सध्यास्थितीत जिल्ह्यात ४ हजार ४६९ क्विंटल बियाण्यांचा साठा उपलब्ध झाला आहे. उर्वरित बियाण्यांचा साठा लवकर उपलब्ध होणार आहे. त्यामुळे शेतकºयांना वेळेवर खत व बियाणे मिळतील, असा विश्वास कृषी विभागाने व्यक्त केला आहे.खरिप हंगामाच्या तोंडावर शेतकºयांची बियाणे व खतासाठी धावपळ सुरू होते. याच संधीचा फायदा घेत अनेक कृषी केंद्र संचालक बियाणे व खताची कृत्रिम टंचाई निर्माण करून जादा दराने विक्री करीत असतात. त्यामुळे शेतकºयांची लूट होत असल्याचा प्रकार दरवर्षी बघायला मिळते. यासाठी कृषी विभागाने खबरदारी घेत यावर्षी बियाणे व खताची टंचाई निर्माण होवू नये, यासाठी नियोजन केले आहे.यावर्षीच्या खरिप हंगामासाठी सार्वजनिक स्वरूपात १९ हजार ९२३ क्ंिवटल बियाण्यांची मागणी आहे. तर खासगी स्वरूपात ४८ हजार ८८२ क्विंटल अशी ६८ हजार ८०५.३० क्विंटल बियाण्यांची मागणी आहे. यापैकी सार्वजनिक मागणीनुसार १५९९ क्विंटल तर खासगी मागणीनुसार २८७० क्विंटल बियाणे उपलब्ध झाले आहे. यामध्ये भात, ज्वारी, तूर, कापूस, मुंग, उडीद, सोयाबीन, तीळ, कापूस, कापूस बीटी व इतर बियाण्यांचा समावेश असला तरी सध्या भात व सोयाबीन बियाणेच उपलब्ध झाले आहेत. लवकरच सर्व बियाणे उपलब्ध होतील, असे कृषी विभागाने म्हटले आहे.बियाण्यांची उगवण क्षमता तपासावीशेतकरी उसनवारी किंवा कर्ज काढून बियाण्यांची खरेदी करतात. मात्र अनेकांचे बियाणे पेरणी केल्यानंतर उगवत नाही. यात पूर्ण खर्च पाण्यात जातो. अशा वेळी काही शेतकरी कृषी विभागाकडे तक्रार करतात. मात्र निकृष्ठ दर्जाचे बियाणे विकणाऱ्यावर कारवाई होत नाही. शेतकºयाला मात्र नाईलाजास्तव दुसºयांदा बियाणे खरेदी करून पेरणी करावी लागत असते. त्यामुळे कृषी विभागाने विक्रीस असलेल्या बियाण्यांची आधीच चौकशी करून त्या बियाण्यांची उगवण क्षमता आहे किंवा नाही, हे तपासूनच विक्रीचे आदेश द्यावे, अशी मागणी आहे.