एचआयव्ही पॉझिटिव्ह ६४ महिलांनी दिला निगेटिव्ह बाळांना जन्म

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2021 04:23 IST2021-01-15T04:23:30+5:302021-01-15T04:23:30+5:30

चंद्रपूर : काेरोना विषाणूचा हैदोस सुरू होण्याआधीच जगभरात एड्स म्हणजे ‘अक्वायर्ड इम्यूनो डिफिशिएन्सी सिंड्रोम’ एचआयव्ही विषाणूने मानवी जीवन ...

64 HIV positive women give birth to negative babies | एचआयव्ही पॉझिटिव्ह ६४ महिलांनी दिला निगेटिव्ह बाळांना जन्म

एचआयव्ही पॉझिटिव्ह ६४ महिलांनी दिला निगेटिव्ह बाळांना जन्म

चंद्रपूर : काेरोना विषाणूचा हैदोस सुरू होण्याआधीच जगभरात एड्स म्हणजे ‘अक्वायर्ड इम्यूनो डिफिशिएन्सी सिंड्रोम’ एचआयव्ही विषाणूने मानवी जीवन हादरले होते. मात्र, आरोग्य क्षेत्रातील निरंतर शोध, संशोधन व प्रभावी उपचार अंमलबजावणीमुळे या आजाराला प्रतिबंध घालण्याचे मार्ग सापडले. जिल्हा एड्स प्रतिबंधक नियंत्रण कक्षानेही याकडे विशेष लक्ष दिले, त्यामुळे जिल्ह्यात एप्रिल २०१९ ते मार्च २००० या वर्षांत एचआयव्ही पॉझिटिव्ह ६४ महिलांनी निगेटिव्ह बाळांना जन्म दिला. केवळ एकच बाळ पॉझिटिव्ह जन्माला आले आहे. बाधित माता व बाळावर एआरटी उपचार सुरू आहे.

एचआयव्ही माणसाची नैसर्गिक रोगप्रतिकारक शक्ती ढासळते. एड्स हा रोग नाही. परंतू, ती एक शारीरिक स्थिती असल्याचे मेडिकल एक्सपर्टचे म्हणणे आहे. एड्‌स झालेल्या व्यक्तीला इतर संसर्गजन्य रोगांची सहज लागण होऊ शकते. एचआयव्ही रक्तातील रोगप्रतिकारक पेशीं लिम्फोसाईट्सवर आक्रमण करतात. एड्स पीडितांच्या शरीरातील रोगप्रतिकारक क्षमता हळूहळू कमी होत गेल्याने सर्दी व खोकल्यासारखे साधे तसेच क्षयासारखे रोग होतात. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निवृत्ती राठोड यांच्या मार्गदर्शनात जिल्ह्यात एप्रिल २०१९ ते मार्च २०२० मध्ये ५३ हजार ३३८ तर एप्रिल ते डिसेंबर २०२० पर्यंत ३४ हजार ६३ चाचण्या करण्यात आल्या. यामध्ये एचआयव्ही पॉझिटिव्ह ६४ महिलांनी निगेटिव्ह बाळांना जन्म दिला. केवळ एकाच मातेचे बाळ पाॅझिटिव्ह आढळले. माता व बाळावर एआरटी उपचार सुरू आहे.

औषधोपचारात हवे सातत्य

एचआयव्ही बाधितांनी वेळेवर उपचार केले नाही तर अवघड होते. त्यामुळे जिल्हा एड्स प्रतिबंधक नियंत्रण कक्षाच्या दिशानिर्देशानुसार स्वयंसेवी संस्था जिल्ह्यात अधिकाधिक चाचणी करीत आहेत.

बाधित गरोदर मातांना एआरटीशी लिंक करून दरमहा उपचार केले जाते. सकस आहार, शासकीय आरोग्य संस्थेतच बाळंतपण करावे, नियमित आरोग्य तपासणी व उपचारात सातत्य ठेवण्या सूचना दिल्या जातात.

१५ केंद्रांमधून एआरटी मोफत

एचआयव्हीवर प्रभावी उपचार उपलब्ध आहे. १५ शासकीय रुग्णालयातून एआरटी मोफत मिळते. एकापेक्षा अधिक व्यक्तींबरोबर लैंगिक संबंध टाळावा, एचआयव्ही संसर्ग झाला असेल तर तुमच्या साथीदाराला कल्पना द्या. त्यामुळे हा संसर्ग तुमचा साथीदार व मुलांनाही होण्याची शक्यता असते.

कोट

जिल्हा एड्स प्रतिबंधक नियंत्रण पथकाकडून वर्षभर आरोग्य मोहीम सुरू असते. चाचण्यांची संख्या आणि उपचाराची व्याप्तीही वाढविण्यात आली. त्यामुळे एचआयव्ही पॉझिटिव्ह ६४ महिलांनी निगेटिव्ह बाळांना जन्म दिला. बाधितांवर उपचार करणे व संसर्ग होऊ नये, यासाठी जनजागृतीवर भर देणे सुरू आहे.

- सुमंत पानगंटीवार, जिल्हा कार्यक्रम अधिकारी, जिल्हा एड्स प्रतिबंध नियंत्रण, चंद्रपूर

Web Title: 64 HIV positive women give birth to negative babies

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.