62 बिनविरोध, तर 32 विजयी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2021 05:00 IST2021-12-23T05:00:00+5:302021-12-23T05:00:43+5:30

तालुक्यातील खरकाडा, मेंडकी, चोरटी व कोसंबी खडसमारा या गावात प्रत्येकी एका जागेसाठी पोटनिवडणूक झाली. खरकाडा येथे अनुसूचित जातीच्या एका जागेवर सत्यवान सहारे हे विजयी झाले. तीन उमेदवारांत अटीतटीची झाली. मेंडकी येथे सुधाकर गणपत महाडोरे विजयी झाले. चोरटी येथे सुरेखा विठ्ठल कांबळी विजयी झाल्या, तर कोसंबी खडसमारा येथे छत्रपती श्रीराम सुरपाम विजयी झाले. या निकालानंतर जल्लोष करण्यात आला.

62 unopposed, while 32 won | 62 बिनविरोध, तर 32 विजयी

62 बिनविरोध, तर 32 विजयी

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : २६ ग्रामपंचायतींच्या मंगळवारी झालेल्या पोटनिवडणुकीची मतमोजणी बुधवारी संबंधित तहसील कार्यालयात पार पडली. यामध्ये विविध पक्षांचे ३२ समर्थक उमेदवार विजयी झाले. निकाल जाहीर होताच गुलाल उधळून जल्लोष केला. निवडणुकीसाठी राजकीय पक्षांनीही प्रतिष्ठा पणाला लावली होती.  निकालात आपल्याच समर्थकांचा विजय झाल्याचे दाव- प्रतिदावे नेत्यांकडून सुरू झाले आहेत. 

विरूरमध्ये एक जागा अविरोध

विरूर स्टेशन : विरूर येथे प्रभाग क्रमांक १ मधून शेतकरी संघटने समर्थित मल्लू मल्लेश मानपेल्ली अविरोध झाले. प्रभाग क्रमांक ४ मध्ये काँग्रेस समर्थित  रवींद्र काशीनाथ कुळमेथे व शिवसेना समर्थित विकास धर्मा सिडाम यांच्यात लढत होती. रवींद्र कुळमेथे यांना २३४ मते मिळाली.

येरखडा, पिंपळगावात चुरस 
चिमूर : येरखेडा ग्रामपंचायतीत पुष्पा पुंडलिक देवतळे यांनी प्रतिस्पर्धी वनिता संजय चिंचुलकर यांच्यावर विजय मिळविला. पिंपळगाव येथे मंगेश सदाशिव ननावरे १४३ मते घेऊन विजयी झाले, प्रतिस्पर्धी यशवंत गजानन बारेकर यांना ८३ मतेच मिळाली. निवडणूक निर्णय अधिकारी तहसीलदार कोवे व अव्वल कारकून लोखंडे यांनी काम पाहिले.

खापरीत नोटाचा वापर
वरोरा : खापरीच्या पोटनिवडणुकीत सविता सुनील माथनकर १७९ मते घेऊन विजयी झाल्या. हर्षलता गणेश साळवे ५७ मते, दोन नाेटाला मतदान केले. सोनेगावात मंदा विठ्ठल तोडासे ९४ मते घेत विजयी झाल्या. गंगाबाई मोहनदास किनाके ७३ मते, बोरगाव मोकाशीमध्ये सुवर्णा चंद्रकांत माथनकर ९९ मत घेत विजयी झाल्या. सविता अनिल पेंदाम ५१ मते तसेच दोघांनी नोटाला पसंती दिली.

येथे काट्याची लढत
ब्रम्हपुरी : तालुक्यातील खरकाडा, मेंडकी, चोरटी व कोसंबी खडसमारा या गावात प्रत्येकी एका जागेसाठी पोटनिवडणूक झाली. खरकाडा येथे अनुसूचित जातीच्या एका जागेवर सत्यवान सहारे हे विजयी झाले. तीन उमेदवारांत अटीतटीची झाली. मेंडकी येथे सुधाकर गणपत महाडोरे विजयी झाले. चोरटी येथे सुरेखा विठ्ठल कांबळी विजयी झाल्या, तर कोसंबी खडसमारा येथे छत्रपती श्रीराम सुरपाम विजयी झाले. या निकालानंतर जल्लोष करण्यात आला.

सास्ती, रामपूर, हरदोना शिवसेना समर्थकांची बाजी
राजुरा : तालुक्यातील सास्ती येथे शिवसेना समर्थित २ उमेदवार, रामपूर  १ आणि हरदोना येथे १ उमेदवार असे एकूण चारजण विजयी झाले. सास्तीत मुरारी बुगावार व पौर्णिमा भटारकर, रामपूरात लता डूखरे, हरदोना येथे किसन टेकाम अशी विजयी उमेदवारांची नावे आहेत. शिवसेना जिल्हाप्रमुख संदीप गिऱ्हे यांच्या नेतृत्वात निवडणूक लढली. 

 

Web Title: 62 unopposed, while 32 won

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.