रोहयोने दिले ५८ हजार मजुरांच्या हाताला काम

By Admin | Updated: May 18, 2016 00:45 IST2016-05-18T00:45:37+5:302016-05-18T00:45:37+5:30

बेरोजगार मजुरांच्या हाताला काम मिळावे, यासाठी शासनाने महात्मा गांधी रोजगार हमी ही महत्त्वाकांक्षी योजना सुरू केली.

58 thousand laborers gave jobs to Roha | रोहयोने दिले ५८ हजार मजुरांच्या हाताला काम

रोहयोने दिले ५८ हजार मजुरांच्या हाताला काम

जिल्ह्याचा दुसरा क्रमांक : तीव्र उन्हामुळे कामांवर परिणाम
परिमल डोहणे चंद्रपूर
बेरोजगार मजुरांच्या हाताला काम मिळावे, यासाठी शासनाने महात्मा गांधी रोजगार हमी ही महत्त्वाकांक्षी योजना सुरू केली. या योजनेमुळे जिल्ह्यातील तब्बल ५८ हजार ४२९ मजुरांच्या हाताला काम मिळाले असून ही कामे उपलब्ध करून देण्यात चंद्रपूरचा राज्यात दुसरा क्रमांक लागला आहे.
चालु वर्षात जिल्ह्यात विविध गावांमध्ये शेकडो कामे सुरू आहेत. यात विहिरींचे बांधकाम, तलाव खोलीकरण, शेततळे बांधकाम, गाळ उपसा, रस्त्यांचे बांधकाम अशी कामे केली जात आहेत. उन्हाळ्याच्या दिवसांत शेतीची कामे राहत नसल्याने शेकडो ग्रामीण मजूर कामाच्या प्रतीक्षेत असतात. अनेक नागरिक रोजगारासाठी इतर ठिकाणी स्थलांतर होतात.
अशातच रोहयोची कामे मजुरांना दिलासा देणारी ठरली आहेत. कामाची मागणी केल्यास मजुरांना प्रशासनाकडून रोहयोच्या माध्यमातून कामे उपलब्ध करून दिली जात आहेत. सध्या जिल्ह्यात शेकडो कामे सुरू असून या कामांवर ५८ हजार ४२९ मजूर काम करीत आहेत. मात्र सध्या कडक उन्ह तापत असल्याने काही ठिकाणी कामे बंद आहेत.

आता मिळणार १५० दिवस काम

राज्यात जिल्ह्याचा दुसरा क्रमांक
रोहयोचे कामे उपलब्ध करून त्या कामांवर मजुर उपस्थितीच्या बाबतीत चंद्रपूर जिल्ह्याचा राज्यात दुसरा क्रमांक आहे. गोंदिया जिल्हा आघाडीवर असून त्या जिल्ह्यात ६८ हजार ६६२ मजुरांची उपस्थिती आहे. तर रायगड जिल्हा पिछाडीवर असून तिथे केवळ ३०३ मजूर काम करीत आहेत.

‘मागेल त्याला काम’ असे ब्रिद असलेल्या या योजनेच्या जॉबकार्डधारकांना शासन नियमानुसार १०० दिवस काम देण्यात येत होते. परंतु यावर्षी दुष्काळी वर्ष जाहीर करून केंद्र शासनाच्या ग्रामीण विकास मंत्रालयाने १०० दिवसांऐवजी १५० दिवस काम देण्यात येणार आहे.

मजुरीचे दर वाढले
रोजगार हमी योजनेच्या कामावर काम करणाऱ्या मजुरांना यापूर्वी १८० रुपये मजुरी दिली जात होती. यावर्षी केंद्र शासनाने मजुरीचे दर वाढविले असून १९२ रुपये मजुरी दिली जात आहे.

Web Title: 58 thousand laborers gave jobs to Roha