५४० घरांचे पावसामुळे नुकसान
By Admin | Updated: September 15, 2014 00:01 IST2014-09-15T00:01:30+5:302014-09-15T00:01:30+5:30
६ ते ८ आॅगस्टदरम्यान जिल्ह्यात पडलेल्या पावसामुळे तब्बल ५४० घरांचे नुकसान झाले आहे. यात दोघांचा मृत्यू झाला. तर, ५ गोठ्यांचेही तसेच नदी-नाल्याकाठावरील शेतीचे तसेच रस्त्यांचेही मोठे नुकसान झाले आहे.

५४० घरांचे पावसामुळे नुकसान
चंद्रपूर : ६ ते ८ आॅगस्टदरम्यान जिल्ह्यात पडलेल्या पावसामुळे तब्बल ५४० घरांचे नुकसान झाले आहे. यात दोघांचा मृत्यू झाला. तर, ५ गोठ्यांचेही तसेच नदी-नाल्याकाठावरील शेतीचे तसेच रस्त्यांचेही मोठे नुकसान झाले आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयातून मिळालेल्या माहितीनुसार सर्वात अधिक नुकसान सावली तालुक्याचे झाले आहे. येथील १६३ घरांचे मोठे नुकसान झाले आहे. राजुरा तालुक्यात १२०, गोंडपिपरी ६३, मूल २५, सिंदेवाही ८७, ब्र्रह्मपुरी ४८, भद्रावती मध्ये ३२, कोरपना तसेच जिवती तालुक्यातील प्रत्येकी एका घरांचे नुकसान झाले. याव्यतिरिक्त ५ गोठ्यांचेही नुकसान झाले आहे. या नैसर्र्गिक आपत्तीत दोन जणांचा मृत्यू झाला. बल्लारपूर, ब्रह्मपुरी तालुक्यातील एका व्यक्तीचा मृत्यू झाला.(नगर प्रतिनिधी)